संकीर्ण चालू घडामोडी (31 मे 2011 पर्यंत)
- राज्यातील पहिले कायमस्वरूपी बालन्यायालय : नाशिक जिल्ह्यात सुरु.
- प्रादेशिक सेनेची स्थापना: 1 ऑक्टोबर 1942
- स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल सी. राजगोपालाचारी यांनी केली. प्रवेश फक्त पुरुषांसाठी असून वयोमर्यादा 18 ते 42 वर्ष इतकी आहे.
- राष्ट्रीय मतदार दिवस : 25 जानेवारी. (घटनेच्या कलम 324 नुसार निवडणूक आयोगाची स्थापना झाली आहे. )
- ई- स्कॉलरशिप योजना - सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडून राबविण्यात येत आहे.
- ध्वजदिन : 7 डिसेंबर
- पहिले आंतरराष्ट्रीय उर्जा संमेलन : व्ही.एन. आय.टी. नागपूर येथे संपन्न
- कार्यालयीन कामकाजात सुसूत्रतता यावी यासाठी अहमदनगर महसूल प्रशासनाने 'ई-मित्र ' हि सेवा सुरु केली आहे.
- महाराष्ट्र शासन औरंगाबाद शहरात 'हज हाउस' उभारणार आहे.
- सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडील निकालानुसार दुचाकी तयार करणाऱ्या कंपन्यांना आता दुचाकी सोबत हेल्मेट ची विक्री करणे बंधनकारक आहे.
- देशातील सध्याचे सेंद्रिय शेतीचे क्षेत्र : साडे दहा लाख हेक्टर इतके आहे.
- राज्याचा 21% वरून 33% इतके वनक्षेत्र वाढवण्याचा निर्णय.
- महाराष्ट्र आणि बिहार मधल्या दुर्मिळ आणि नष्ट होत चाललेल्या वनस्पतींचे सर्वेक्षण करण्याचा प्रकल्प 'सी डॅक ' ने हाती घेतला आहे.
- "कोकण राजा" हि सॅलॅड साठी उपयोगात येणारी आंब्याची नवीन जात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रादेशिक फळ संशोधन केंद्राकडून विकसित.
- स्पेन हा फिफा फुटबॉल वर्ल्ड कप जिंकणारा जगातला आठवा देश ठरला.
- जागतिक पर्यटन दिन: 27 सप्टेंबर
- संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाची सुरुवात 2000-01 साली झाली.
- 'सुपरमून ' हि घटना 20 मार्च 2011 रोजी घटली. सुपरमून ह्या घटनेत चंद्र आणि पृथ्वी यांतील अंतर सर्वात कमी होते. यापूर्वी सुपरमून घटना 2005 साली घटली होती .
- भाभा अणुसंशोधन केंद्राच्या (BARC) वैज्ञानिकांनी हायड्रोजन गॅस वर चालणाऱ्या "हायड्रोजन टॉर्च" ची निर्मिती केली आहे.
- भारत-रत्न पुरस्काराने सन्मानित झालेले पहिले महाराष्ट्रीयन व्यक्तिमत्त्व => महर्षी धोंडो केशव कर्वे
- 2011 च्या जनगणनेच्या हंगामी आकड्यांनुसार भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा --> ठाणे जिल्हा
- राजीव गांधी जीवनदायी योजना राज्य शासनाकडून 1 लाख रुपये व त्या पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी सुरु करण्यात आली आहे.
- नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कार्पोरेशन (NDFC) चे अध्यक्ष : ओम पुरी
No comments:
Post a Comment