Saturday, February 4, 2012

संकीर्ण चालू घडामोडी भाग-5

  • अमेरिकन कादंबरीकर फिलीप रॉथ चौथ्या मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पारितोषिकाचे मानकरी ठरले आहेत.
  • हे पारितोषिक पहिल्यांदा २००५मध्ये दिले गेले, त्यानंतर दर दोन वर्षांनी मूळ इंग्रजीतील किंवा इंग्रजीत अनुवाद झालेल्या पुस्तकांचा या पारितोषिकासाठी विचार केला जातो.
  • लक्षात  ठेवा बुकर पारितोषिक फक्त राष्ट्रकुल देशातील साहित्यिकालाच दिले जाते. तर मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पारितोषिक कुठल्याही साहित्यिकाला मिळू शकते.
  • बांगलादेशचे नोबेल विजेते मोहम्मद युनूस यांनी ग्रामीण बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा राजीनामा दिला. मायक्रो फायनान्स करणा-या ग्रामीण बँकेचे युनूस संस्थापक होत.
  • दुसऱ्या महायुद्धात जागतिक शांततेचा घास घेणारा नाझी भस्मासुर अॅडॉल्फ हिटलर आणि अमेरिकेच्या भूमीवर दहशतवादाचे थैमान घालून जागतिक दहशतवादाचा चेहेरा बनलेला ओसामा बिन लादेन यांचा अस्त एकाच दिवशी : मे
  • जपानमधील भूकंपानंतर किरणोत्साराने धोक्याची सर्वोच्च पातळी गाठण्यामुळे चर्चेत आलेला अणुप्रकल्प : फुकुशिमा दाईईची
  • या पूर्वीचा मोठा अश्या स्वरूपाचाकिरणोत्सार रशियातील चेनोर्बिल अणुभट्टीत 1979 मध्ये झाला होता.
  • दिवंगत ज्येष्ठ कवयित्री आणि कथालेखिका इंदू शर्मा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणारा 'आंतरराष्ट्रीय इंदू शर्मा कथा सन्मान' पुरस्कार भारतीय कादंबरीकार विकास कुमार झा यांना त्यांच्या 'मॅकक्लुस्कीगंज' या कादंबरीला जाहीर.
  • फ्रान्समध्ये बुरखा बंदी.युरोपातील सर्वाधिक मुस्लिम नागरिक असलेल्या फ्रान्सने स्त्री-हक्काच्या नावाखाली हे धाडसी पाऊल उचलले .
  • ' हेपेटायटिस बी ' या विषाणूचा शोध लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे नोबेल विजेते शास्त्रज्ञ ब्रुच ब्लुमबर् यांचे दयविकाराच्या झटक्याने नासामध्ये सुरू असलेल्या परिषदेत निधन झाले. 1976 सालचे नोबेल मिळाले होते.
  • भारतीय वंशाच्या अधिकारी गीता पासी यांची बराक ओबामायांच्या कडून अमेरिकेचे जिबौती या अफ्रिका खंडातील देशाच्या राजदूतपदी नियुक्ती .
  • अमेरिकेच्या  ' सिलिकॉन व्हॅली ' मध्ये नवीन जैन या भारतीय अमेरिकन उद्योजकाने चंद्रावर खाणकाम करण्याचा ध्यास घेऊन ' मून एक्स्प्रेस ' नावाची कंपनी स्थापन केली आहे.

No comments:

Post a Comment