Saturday, February 4, 2012

महर्षी धोंडो केशव कर्वे - 1


महर्षी धोंडो केशव कर्वे
  • महर्षी म्हणजे महान संत (ऋषी)
  • जन्म : 18 एप्रिल 1858 => शेरवली ( जिल्हा: रत्नागिरी) =>; जन्म आजोळी झाला.
  • मूळ गाव: मुरुड तालुका: दापोली
  • ( या ठिकाणी हेही ध्यानात ठेवा: कर्वेंनी सन 1886 मध्ये 'मुरुड फंडा 'ची स्थापना केली होती. तसेच पुर्नविवाह केल्यामुळे त्यांच्यावर त्यांच्या गावाने ( मुरुड ) बहिष्कार घातला होता.)
  • प्राथमिक शिक्षण : मुरुड
  • 1881 साली मॅट्रीक उत्तीर्ण.
  • उच्च  शिक्षण: आधी विल्सन  आणि नंतर एलफिस्टन (दोन्हीही मुंबईत.)
  • मुंबईत सुरुवातीला मुलींच्या शाळेत आधी शिक्षक .
  • नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या आमंत्रणावरून फर्ग्युसन कॉलेजात गणिताचे प्राध्यापक म्हणून रुजू.
  • येथून पुढे पुणे हीच त्यांची कर्मभूमी बनली .
  • 1892 => डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे चे आजीव सदस्य बनले.
  • 1893 => विधवाविवाहास चालना मिळावी म्हणून विधवा विवाहोत्तेजक मंडळी हि संस्था काढली.
  • 1895 साली बदलून 'विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळी ' असे ठेवले .
  • स्वतः पहिल्या पत्नीच्या निधनानंतर विधवेशी विवाह करून आदर्श घालून दिला.
  • १८९९ साली पुण्यात 'अनाथ बालीकाश्रम ' ह्या संस्थेची स्थापना केली .
  • १९०० साली हि संस्था पुण्याजवळील हिंगणे येथे हलवली.
  • १९०७ साली त्यांनी हिंगणे येथे 'महिला विद्यालया 'ची स्थापना केली.
  • १९१६ साली महिला विद्यापीठाची स्थापना केली,
  • १९२० साली या संस्थेला शेठ विट्ठल दास ठाकरसी यांनी त्यांच्या मातोश्री यांच्या नावाने २० लाख रुपयांची देणगी दिली, त्यामुळे संस्थेला आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले, परिणामी विद्यापीठाचे 'SNDT' असे नामकरण झाले .
  • महिला विद्यापीठातून मातृभाषेतून शिक्षण देण्याचा सल्ला कर्वेंना  महात्मा गांधीनी  दिला होता .
  • सहावीची  परीक्षा त्याकाळी सरकारी असे आणि त्यासाठी ठराविकच केंद्र असत .कर्वेंना सातारा केंद्र घावे लागले होते आणि त्यासाठी कुंभार्ली घाटातून तब्बल १२५ मैल अन्तर चालून परीक्षेस पोहचले होते.
  • १०४ वर्षांचे दिर्घायुष्य लाभले.
  • भारत सरकारने पद्मभूषण आणि भारतरत्न या पुरस्कारांनी सन्मानित केले.
  • १९४२ साली बनारस हिंदू विद्यापीठाने डी.लिट बहाल केली तर १९५१ साली पुणे विद्यापीठाने डी.लिट बहाल केली. सन १९५४ ला एस.एन.डी.टी. ने डी.लिट बहाल केली.
  • १९५८  साली त्यांना त्यांच्या वयाच्या  शताब्दी साली 'भारतरत्न 'ने सन्मानित करण्यात आले.

No comments:

Post a Comment