Saturday, February 4, 2012

संकीर्ण चालू घडामोडी भाग-3

  • कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते ओमन चांडी यांनी केरळचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
  • इजिप्तच्या विशेष सेनेचा माजी अधिकारी सैफ अल अदेल अलकायदाच्या प्रभारी प्रमुख पदी.
  • हॉटेलमधील महिला कर्मचाऱ्यावर बलात्काराचा प्रयत्न केल्याबद्दल आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ)चे व्यवस्थापकीय संचालक आणि २०१२मध्ये होणाऱ्या फ्रान्सच्या अध्यक्षीय निवडणुकीतील उमेदवार डोमिनिक स्ट्रॉस कान यांना  अटक
  • शेतकऱ्यांचे नेते तसेच शेतमजुरांच्या प्रश्नाबाबत उत्तर भारतात अनेकदा संघर्ष करणारे नेतृत्त्व करणाऱ्या भारतीय किसान युनियनचे नेते महेन्द्रसिंग टिकैत यांचे  निधन.
  • रस्तांवरील अपघातांमध्ये होणा-या मृत्यूंच्या संख्येबाबत भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे असे डब्ल्यूएचओच्या अहवालात म्हटले आहे.
  • पुढील वर्षी पहिली महिला अंतराळवीर अंतराळात पाठवण्याचा चीनचा इरादा आहे.
  • संयुक्त अरब अमिरातीकडून पाकव्याप्त काश्मीरमधील 'पंतप्रधान' सरदार आतिक अहमद यांच्यासह सर्व रहिवाशांसाठी स्टॅपल व्हिसा लागू करण्यास सुरुवात झाली आहे.
  • आमदारांच्या स्थानिक विकास निधीची रक्कम वाढवून प्रत्येकी दोन कोटी रुपये करण्यात आली आहे.
  • आपल्या पहाडी आवाजातील शाहिरीने संपूर्ण महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करणारे शाहीर योगेश उर्फ दिवाकर नारायण भिष्णूरकर यांचे  वृद्धापकाळाने निधन.
  • लिओन पॅनेटा अमेरिकेचे नवे संरक्षणमंत्री. विद्यमान संरक्षणमंत्री रॉबर्ट गेट्स यांच्याजागी सीआयएचे विद्यमान संचालक लिओन पॅनेटा यांची नियुक्ती करण्यात आली असून अफगाणिस्तानातील कमांडर डेव्हिड पेट्रॉस यांना सीआयएच्या संचालकपदी नियुक्त करण्यात आले आहे.
  • नवव्या अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ मुस्लीम मराठी साहित्यिक विचारवंत जावेद पाशा. स्थळ: सांगली .
  • 'गोदरेज-बॉईस' या कंपनीनेही टाइप-रायटरचे  उत्पादन बंद केल्याने ही 'टकटक' आता पूर्णपणे बंदच होणार.हॉलिवूडची ख्यातनाम अभिनेत्री लिंडसे लोहान हिला ज्वेलरीच्या दुकानातून हार चोरल्याच्या आरोपावरून काल शुक्रवारी १२० दिवसांची तुरूंगवासाची सजा.
  • होस्नी मुबारक यांची सुमारे तीन दशकांची एकाधिकारशाही मोडून लोकशाहीची नवी सुरूवात करणाऱ्या इजिप्तला भारताकडून वोटिंग मशीन्स पुरविली जाणार.
  • एका पाठोपाठ एक अशा आपत्तींना तोंड देणाऱ्या जपानने शुक्रवारी ५० अब्ज अमेरिकन डॉलरचे विशेष बजेट जाहीर करणार असल्याचे जाहीर केले आहे.भारतीय वंशाचे कॅन्सर विशेषज्ज्ञ सिद्धार्थ मुखर्जी यांना २०११ सालचा प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कार जाहीर झाला आहे. पुलित्झर पुरस्कार मिळवणारे मुखर्जी हे भारतीय वंशाचे चौथे नागरिक ठरले आहेत. एम्परर ऑफ ऑल मेलडीज - बायोग्राफी ऑफ कॅन्सर या नॉन फिक्शन गटात मोडणा-या पुस्तकासाठी सिद्धार्थ मुखर्जी यांना हा पुरस्कार.
  • देशद्रोहाच्या आरोपाखालील खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिलेले पीपल्स युनियन फॉर सिव्हील लिबर्टीज्चे कार्यकर्ते डॉ. बिनायक सेन यांचा केंद्राच्या नियोजन आयोगाच्या आरोग्यविषयक सुकाणू समितीत सदस्य म्हणून समावेश.
  • ब्लॅकबेरीचे (रिसर्च इन मोशन) संस्थापक प्रमुख माइक लझारीडीस.
  • जे. जयललिता आज तामिळनाडूच्या तिसऱ्यांदा मुख्यमंत्री.तामिळनाडूचे राज्यपाल सुरजितसिंग बर्नाला.
  • एन. रंगास्वामी हे तिसऱ्यांदा पद्दुचेरी या  केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री बनले.
  • डॉलरच्याऐवजी स्वत:च्या देशातील चलन वापरून परस्परांना कर्जे निधी देण्याच्या करारावर भारतासह ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका (ब्रिक्स) यांच्यात  स्वाक्ष-या होणार आहेत.
  • अंतराळवीर युरी गागारिनने ५० वर्षांपूवीर् 'व्होस्टोक स्पेसक्राफ्ट'मधून केलेल्या ऐतिहासिक पृथ्वी परिभ्रमणाचा सुवर्णमहोत्सव साजरा झाला. १२   एप्रिल १९६१ रोजी प्रदक्षिणा घातली होती

No comments:

Post a Comment