Tuesday, February 7, 2012

संकीर्ण चालू घडामोडी भाग-10

  • 'बखर : भारतीय प्रशासनाची': कोल्हापूरचे जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी त्यांच्या अनुभवातून आणि अभ्यासातून लिहिलेले पुस्तक
  • स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजनेचे राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानात  (National Rural Livelihoods Mission- NRLM)  रुपांतर
  • राज्य शासनाने नुकताच जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीमध्ये महिलांसाठी ५० टक्के जागा आरक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे.  त्यासाठी मुंबई ग्रामपंचायत कायदा 1958 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
  • राज्यातील विद्यार्थ्यांना पाचवीपासून व्यवसायशिक्षणाचे धडे देण्याचा राज्य शासन विचार करीत आहे..
  • जगातील सर्वाधिक महाकाय क्रेनची निर्मिती केल्याचा दावा चीनने केला आहे.
  • राज्यात 1999 पासून पल्स पोलिसो लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.
  • राज्यात भूगर्भातील औष्णिक ऊर्जेपासून (जिओथर्मल) वीजनिर्मितीचा प्रकल्प उभारण्यासाठी "महाऊर्जा' व थरमॅक्‍स कंपनीमध्ये सामंजस्य करार करण्याच्या प्रस्तावाला मान्यता.
  • 'नॅशनल लिगल ई-लायब्ररी ' हे  कायदेविषयक ऑन-लाईन ग्रंथालय 15 ऑगस्ट 2011 रोजी कार्यान्वित होणार.
  •  ग्रामीण भारतचा चेहरामोहरा बदलण्यासाठी  राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान  (National Rural Livelihoods Mission- NRLM) चे ३ जून  २०११ रोजी राजस्थानातील बांसवारा येथे सोनिया गांधींच्या हस्ते उद्-घाटन.
  • सुनील मित्रा यांची भारतचे अर्थ- सचिव म्हणून नियुक्ती.
  • महिला आणि बालविकास क्षेत्रात उत्कृष्ट  कार्य  करणाऱ्या व्यक्ती आणि समाजसेवी संस्था तसेच स्वयंसेवी संस्थांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार दिला जातो.  
  • आंतरराष्ट्रीय महिला दिनी ( ८ मार्च ) तेव्हाच्या रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी विद्यार्थींनीसाठी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होईपर्यंत रेल्वे प्रवासाची घोषणा केली. 
  • २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम ओळंबे यांचा गिरगाव चौपाटी येथे पुतळा उभारण्यात येणार.
  • राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात औरंगाबाद जिल्हा परिषदेला राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार.
  • जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश लोकायुक्तांच्या  कार्यकक्षेत करण्यात आला.

No comments:

Post a Comment