Sunday, January 19, 2014

पेन्शन योजनेतील २५ टक्के रक्कम काढण्याची परवानगी?


राष्ट्रीय पेन्शन ‌सिस्टिममधील नव्या तरतुदींचा प्रस्ताव

वृत्तसंस्था, नवी दिल्ली
pension

राष्ट्रीय पेन्शन सिस्टिमअंतर्गत सुरू झालेल्या पेन्शन योजनेतील ग्राहकांना जमा झालेल्या रकमेपैकी २५ टक्के रक्कम दहा वर्षांच्या कालावधीनंतर काढून घेण्याची परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे. या योजनेची नियामक संस्था, 'पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपेंट अॅथॉरिटी'ने (पीएफआरडीए) नवी मार्गदर्शक तत्त्वे लागू करून ही योजना अधिक आकर्षक बनवण्यासाठी शिफारशी केल्या आहेत. त्यात, रक्कम काढून घेण्यासंदर्भातील महत्त्वाची शिफारस करण्यात आली आहे.

सन २००४ पासून ही योजना लागू झाली असून केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी या योजनेत रक्कम जमा करणे सक्तीचे करण्यात आलेले आहे. या योजनेचा लाभ देशातील १८ ते ६० वर्षांपर्यंतच्या कोणत्याही व्यक्तीला घेता येतो. त्यासाठी स्वतंत्र खाते काढता येते व महिन्याला किमान ५०० रुपये या खात्यात टाकता येतात. मुदतीनंतर पेन्शन स्वरूपात ही रक्कम खातेदाराला मिळू शकते.

या योजनेअंतर्गत आतापर्यंत मुदतीपूर्वी रक्कम काढण्याची सवलत नव्हती. पैसे काढायचे असतील तर या योजनेतूनच बाहेर पडावे लागत होते. ही त्रुटी नव्या शिफारशींमुळे दूर होण्याची शक्यता असून अधिकाधिक लोकांना ती सोयीची ठरी शकेल!

केंद्र सरकारने निवृत्तीनंतर लोकांना अर्थिक मदत मिळत राहावी यादृष्टीने ही योजना सुरू केली आणि त्यासाठी पेन्शन कायद्यातही सुधारणा करून त्याचे नियंत्रण करण्यासाठी नियामक संस्थेचीही निर्मिती केली. असे असले तरी अजून ही योजना सरकारी कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त सामान्य लोकांपर्यंत अपेक्षेइतकी पोहोचलेली नाही. त्यामुळे ही योजना अधिक लोकप्रिय करण्यासाठी त्यातील अडचणी दूर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पैसे कोणत्या कारणांसाठी काढता येतील?

- वैद्यकीय उपचारांवरील खर्च; प्रामुख्याने कॅन्सर, किडनी, अवयव रोपण, हृदय शस्त्रक्रिया, मेंदूतील रक्तस्त्राव, संपूर्ण आंधळेपाणा, अर्धांगवायू असे गंभीर आजार

- अपत्यांच्या उच्च शिक्षणासाठी

- मुलींच्या लग्नासाठी

- घर खरेदीसाठी

पैसे किती वेळा काढता येतील?

- कमाल तीन वेळा पैसे काढता येतील.

- प्रत्येकी पाच वर्षांचे अंतर असण्याचे गरजेचे

No comments:

Post a Comment