Showing posts with label MPSC. Show all posts
Showing posts with label MPSC. Show all posts

Tuesday, January 21, 2014

डॉ. बाबासाहेब उर्फभीमराव रामजी आंबेडकर





Birth Date - 14 April 1891Birth Place - Mahu (Madhya Pradesh)
Original Surname - Ambavade (Ratnagiri)
Death - 6 December 1956
समाधी - चैत्यभूमी, दादर (मुंबई)
प्राथमिक शिक्षण रत्नागिरी येथे झाले
माध्यमिक शिक्षण सातारा आणि मुंबई येथे झाले
महाविद्यालयीन शिक्षण मुंबई येथे झाले
घटनाक्रम -
* १९०६ - रमाबाईशी लग्न झाले
* १९०७ - मेट्रिक परीक्षा पास
* १९१३ -प्राचीन भारतातील व्यापार (Ancient India Commerce) हा प्रबंध सादरकरून कोलंबिया विद्यापीठाची M.A. डिग्री संपादन केली. यासाठी त्यांना सयाजीरावगायकवाड यांचे आर्थिक पाठबळ मिळाले.
* १९१६ - भारताचा राष्ट्रीय नफ्यातील वाटा(National Dividend of India) हा प्रबंध सादर करून कोलंबिया विद्यापीठाची पी. एच.डी. मिळवली. यावेळी सयाजीराव गायकवाड यांचेचआर्थिक पाठबळ मिळाले.
* १९१६ -Cast in India - हा ग्रंथलिहिला.
* १९१८-१९२० - मुंबईतीलसिडनेहॅममहाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यकेले. वाणिज्य आणि अर्थशास्त्राचे ते प्राध्यापक होते.
* १९२० - ३१ जाने. रोजी राजर्षी शाहू महाराजांच्या मदतीनेमूकनायक हेपाक्षिकसुरु केले.
* १९२०-शाहू महाराजांच्या आर्थिक पाठबळाने इंग्लंडला कायद्याच्या अभ्यासासाठी गेले.
*१९२० - माणगावच्या अस्पृश्यांच्या परिषदेचे अध्यक्षपद भूषविले
* १९२३ - "पैशाचा यक्षप्रश्न" हा शोध प्रबंध लिहून Bar At Law ची पदवी मिळविली (लंडन)
* १९२४ - २० जुलै रोजी "बहिष्कृत हितकारिणी सभा"स्थापन केली.
* १९२६ - मुंबई कायदे मंडळाच्या सदस्यपदी नेमणूक (१९२६-१९३६)
* १९२७ - ३ एप्रिल रोजी'बहिष्कृत भारत'हे पाक्षिक सुरु केले. याच वर्षी'समता' हे वृत्तपत्रसुरु केले.
* १९२७ - २० मार्च रोजीरायगड जिल्ह्यातील महाड येथेडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखालीचवदार तळ्याचा सत्याग्रहझाला. (१९३७ साली हे तळे सर्वांसाठी खुले करण्यातआले )
* १९२७ - २५ डिसेंबर रोजीमहाड येथे मनुस्मृतीचे दहनकरण्यात आले.
* १९२७ - महाड येथे अस्पृश्य परिषद भरवली
* १९२७ - 'समता समाज संघा'ची स्थापना केली
* १९२८ - सायमन कमिशनसमोर साक्ष
* १९३० -नाशिक येथे काळाराम मंदिर सत्याग्रहघडवून आणला. १९३५ साली हे मंदिर सर्वांसाठी खुले करण्यात आले.
* १९३० ते १९३३ दरम्यानच्या तिन्ही गोलमेज परिषदेत अस्पृशांचे नेतृत्व
* १९३२ - २४ सप्टेम्बर रोजीम. गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातपुणे करारझाला यालाचयेरवडा करारअसेही म्हणतात.
* १९३५ - पहिल्या पत्नी रमाबाई यांचे निधन झाले.
* १९३६ - 'स्वतंत्र मजूर पक्षा' ची स्थापना केली.(१९३७ च्या प्रांतिकनिवडणुकीत या पक्षाने १५ जागा जिंकल्या.)
* १९४२ - आप्पा दुराई यांच्या मदतीने नागपुर येथे 'अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट फेडरेशन' ची स्थापना केली.
* १९४६ - मुंबई येथे 'पीपल्स एज्युकेशन सोसायटी' आणि 'सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स' ची स्थापना केली
- 'मिलिंद महाविद्यालय' औरंगाबाद येथे सुरु केले
* १९४७ - स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री बनले. २९ ऑगस्टला भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली
* १९४८ - डॉ. शारदा कबीर उर्फ माई यांच्याशी १५ एप्रिल १९४८ रोजी दिल्ली येथे विवाह झाला.
-हिंदू कोड बीलसंसदेत मांडले पण विरोध झाल्यामुळे मंत्रीपदाचा राजीनामा दिला.
* १९५६ - दिनांक १४ ऑक्टोबररोजी नागपूर (दीक्षाभूमी)येथे हजारो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.
* ६ डिसेंबर १९५६ रोजी निधन झाले
* बाबासाहेब आंबेडकर यांचीसमाधी चैत्यभूमी, दादर (मुंबई)येथे आहे.
इतर महत्वाचे-
बाबासाहेबांच्या प्रिंटींग प्रेस चे नाव 'भारत प्रिंटींग प्रेस' होते.
'रानडे, गांधी आणि जीना' हेपुस्तक त्यांनी लिहिले.
नागपूर येथे रिपब्लिकन पक्षाची घोषणा केली (स्थापना - १९५८- एन शिवराज)
१९९१ - साली भारत सरकारचा मरणोत्तरभारतरत्नपुरस्कार - (१९९१ हे वर्ष सामाजिक न्याय वर्ष म्हणून पाळण्यात आले)
"शिका, संघटीत व्हा आणि लढा" हा संदेश तरुणांना दिला.****

Sunday, January 19, 2014

रिक्षाचालकाच्या मुलाने जिंकले सुवर्ण

गुजरात तंत्रज्ञान विद्यापीठाच्या 62 हजार 800 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान; 143 विद्यार्थ्यांना सुवर्ण अहमदाबाद  : घरात अठरा विश्‍व दारिद्य्र असतानाही उच्च शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगलेल्या एका रिक्षाचालकाच्या मुलाने अभियांत्रिकीच्या पदव्युत्तर परीक्षेत सुवर्णपदक जिंकून आपल्या पित्याला एक अनोखी भेट दिली. गुजरात तंत्रज्ञान विद्यापीठाच्या (जीटीयू) तिसऱ्या पदवीदान सोहळ्यात सुमारे 62 हजार 687 विद्यार्थ्यांना पदवी व पदविका प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. राज्यपाल डॉ. कमला बेनिवाल, कुलगुरू अक्षय अग्रवाल व अध्यक्ष एस. मंथा यांच्या हस्ते या प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. 
चांदखेडा येथील जीटीयूच्या प्रांगणात आयोजित या सोहळ्यात वेगवेगळ्या विभागांच्या 143 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. मात्र अशा विद्यार्थ्यांमध्येच ऑटो रिक्षाचालकाचा मुलगा असलेल्या 25वर्षीय निशांतकुमार याचाही समावेश आहे. त्याने सिव्हिल विभागातील पदव्युत्तर शिक्षणात ही सर्वोत्तम कामगिरी केल्याने त्याचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. झारखंड येथील रहिवासी असलेल्या निशांतकुमारचे वडील रिक्षाचालक आहेत; तर त्याची आई घरकाम करते. 

अन्य विद्यार्थ्यांमध्ये मोरबी येथील पीयूषकुमार कुंदरिया याने सिरॅमिक तंत्रज्ञानामध्ये अव्वल क्रमांक मिळविला. त्याने सांगितले, की अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना सलग तीन वर्षे वैयक्तिक व अन्य समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागले. मात्र तरीही लक्ष्यापासून आपण दूर गेलो नाही. आपल्याला स्वत:चा सिरॅमिक उद्योग उभारण्याचे स्वप्न असून, आपण ते पूर्ण करणार असल्याचे त्याने सांगितले. 
आईवडिलांनी घडविले... निशांतने सांगितले, की माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी खूप काही केले आहे. आता त्यांच्यासाठी काम करण्याची माझी वेळ आहे. मला बडोदा येथे नोकरीही मिळाली असून, तेथे राहण्यासाठी आपल्यासोबत आई व वडिलांनाही आणणार आहे. त्यांनी कठीण परिश्रमातून मला घडविल्यानंतर आता ते त्यांच्या आयुष्यात समाधानी आहेत.

पेन्शन योजनेतील २५ टक्के रक्कम काढण्याची परवानगी?


राष्ट्रीय पेन्शन ‌सिस्टिममधील नव्या तरतुदींचा प्रस्ताव

वृत्तसंस्था, नवी दिल्ली
pension

राष्ट्रीय पेन्शन सिस्टिमअंतर्गत सुरू झालेल्या पेन्शन योजनेतील ग्राहकांना जमा झालेल्या रकमेपैकी २५ टक्के रक्कम दहा वर्षांच्या कालावधीनंतर काढून घेण्याची परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे. या योजनेची नियामक संस्था, 'पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपेंट अॅथॉरिटी'ने (पीएफआरडीए) नवी मार्गदर्शक तत्त्वे लागू करून ही योजना अधिक आकर्षक बनवण्यासाठी शिफारशी केल्या आहेत. त्यात, रक्कम काढून घेण्यासंदर्भातील महत्त्वाची शिफारस करण्यात आली आहे.

सन २००४ पासून ही योजना लागू झाली असून केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी या योजनेत रक्कम जमा करणे सक्तीचे करण्यात आलेले आहे. या योजनेचा लाभ देशातील १८ ते ६० वर्षांपर्यंतच्या कोणत्याही व्यक्तीला घेता येतो. त्यासाठी स्वतंत्र खाते काढता येते व महिन्याला किमान ५०० रुपये या खात्यात टाकता येतात. मुदतीनंतर पेन्शन स्वरूपात ही रक्कम खातेदाराला मिळू शकते.

या योजनेअंतर्गत आतापर्यंत मुदतीपूर्वी रक्कम काढण्याची सवलत नव्हती. पैसे काढायचे असतील तर या योजनेतूनच बाहेर पडावे लागत होते. ही त्रुटी नव्या शिफारशींमुळे दूर होण्याची शक्यता असून अधिकाधिक लोकांना ती सोयीची ठरी शकेल!

केंद्र सरकारने निवृत्तीनंतर लोकांना अर्थिक मदत मिळत राहावी यादृष्टीने ही योजना सुरू केली आणि त्यासाठी पेन्शन कायद्यातही सुधारणा करून त्याचे नियंत्रण करण्यासाठी नियामक संस्थेचीही निर्मिती केली. असे असले तरी अजून ही योजना सरकारी कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त सामान्य लोकांपर्यंत अपेक्षेइतकी पोहोचलेली नाही. त्यामुळे ही योजना अधिक लोकप्रिय करण्यासाठी त्यातील अडचणी दूर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पैसे कोणत्या कारणांसाठी काढता येतील?

- वैद्यकीय उपचारांवरील खर्च; प्रामुख्याने कॅन्सर, किडनी, अवयव रोपण, हृदय शस्त्रक्रिया, मेंदूतील रक्तस्त्राव, संपूर्ण आंधळेपाणा, अर्धांगवायू असे गंभीर आजार

- अपत्यांच्या उच्च शिक्षणासाठी

- मुलींच्या लग्नासाठी

- घर खरेदीसाठी

पैसे किती वेळा काढता येतील?

- कमाल तीन वेळा पैसे काढता येतील.

- प्रत्येकी पाच वर्षांचे अंतर असण्याचे गरजेचे

डॉलरमधील गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंड योजनांचा सर्वाधिक परतावा


जानेवारी ते डिसेंबर २०१३ या कालावधीत डॉलरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युल फंड योजनांनी आजवरचा सर्वाधिक वार्षकि परतावा दिला आहे. डीएसपी ब्लँकरॉक युएस फ्लेक्झी कॅप इक्विटी फंड हा फक्त १३१ कोटींचे व्यवस्थापन पाहणारा फंडाने ४१.६०% परतावा दिला आहे. तर याच म्युच्युअल फंड घराण्याचा डीएसपी ब्लँकरॉक अ‍ॅग्रिकल्चर फंडाने १४% परतावा दिला आहे.
मागील वर्ष भरात अनेक फंड घराण्यांनी डॉलर मध्येगुंतवणूक करणाऱ्या अनेक योजना गुंतवणूकदारांना उपलब्ध करून दिल्या. 'व्हॅल्यू रिसर्च' या म्युच्युअल फंडांची पत ठरविणाऱ्या कंपनीच्या धीरेन्द्र कुमार यांच्या मते, सर्वच डॉलरमधील मालमत्तेत गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांची कामगिरी अव्वल ठरलेली नाही. मागील वर्षी रुपया अवमुल्यनाचा फायदा या योजनांना मिळाला हे प्रमुख कारण आहे. परंतु निव्वळ अवमूल्यन नव्हे तर योजनांची गुंतवणूक नक्की कुठे आहे. हे ही महत्वाचे ठरते.
वेगवेगळ्या फंड घराण्यांनी विविध देशातील आíथक बाजारपेठातील मालमत्तेत गुंतवणूक करणाऱ्या योजना आणल्या त्या योजना नक्की कुठे गुंतवणूक करणार आहेत हेही त्यांच्या चांगल्या किंवा वाईट परताव्याचे कारण ठरले आहे. काही योजना केवळ अमेरिकेत गुंतवणूक करणाऱ्या योजनांचा परतावा अमेरिकेसहीत ब्राझील, मॅक्सिको या तीन देशात गुंतवणूक करणाऱ्या योजनांच्या परताव्यापेक्षा खूपच सरस आहे. याची दोन करणे आहेत. पहिले - एसएनपी ५०० या निर्देशांकाने मागील अर्ध शतकातील सर्वोच्च कामगिरी केली हे आहेच; परंतु डॉलर ही डॉलर इंडेक्समध्ये सर्वाधिक वधारलेले चलन आहे. 'ज्या भारतीय गुंतवणूकदारांनी अशा फंडात गुंतवणूक केली त्यांनातर स्वप्नवत परतावा मिळाला..' गुंतवणूक विश्लेषक मििलद अंधृटकर म्हणतात, 'फ्रॅकलीन टेम्पलटन युएस अपॉच्र्युनिटी फंडाने मागील वर्षभरात ५५.२४% तर आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एक्सपोर्ट अ‍ॅन्ड अदर सíव्हसेस फंडाचा मागील वर्षभराचा परतावा ४३% आहे.' अंधृटकर म्हणाले, 'कोणत्याही योजनेचा परतावात योजनेचा निधी कुठे गुंतविला जातो हे पाहणे आवशयक आहे. या सर्व योजना फंड ऑफ फंड्स प्रकारच्या योजना आहेत. म्हणजे भारतात जमा झालेला निधी एखाद्या परदेशात गुंतवणूक करणाऱ्या योजनेच्या युनिटमध्ये गुंतविला जातो. जसे, फ्रॅकलीन टेम्पलटन युएस अपॉच्र्युनिटी फंड हा इक्विटीमध्ये गुंतवणूक करणारा फंड आहे तर फ्रॅकलीन टेम्पलटन फ्रॅकलीन युएस अपॉच्र्युनिटी फंड व डीएसपी ब्लँकरॉक वल्ड एनर्जी फंड हे दोन्ही कमोडीटी फंड आहेत.


या फंड संकल्पनेतील दोन फंड घराण्यांनी नवीन पर्याय उपलबद्ध करून दिले आहेत. पाईनब्रिज इंडिया या म्युच्युअल फंड घराण्याने पाईनब्रिज इंडिया युएस इक्विटी फंड ही योजनेची डिसेंबर महिन्यात प्राथमिक युनिसचे वाटप पूर्ण करून आता हा फंड पुन:र्खरेदीत गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध आहे. तर रेलीगेर इंव्हेस्को या फंड घराण्याच्या रेलीगेर इंव्हेस्को पॅन युरोप फंड या योजनेची प्राथमिक विक्री २९ जानेवारीपर्यंत सुरु राहणार आहे. युरोपच्या मध्यवर्ती बँकेच्या अर्थव्यवस्थेसाठी प्रोत्साहनात्मक धोरणांना सदस्य देशांच्या सरकारांनी दिलेली साथ पाहता युरोपची अर्थव्यवस्था वेग पकडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. जगभरातील गुंतवणूकदार युरोपमध्ये गुंतवणूक करण्याच्या संधीच्या शोधात आहेत. या संधीचा लाभ भारतीय गुंतवणूकदरांना घेता यावा यासाठी रेलीगेर इंव्हेस्को पॅन युरोप फंड ही योजना आहे.
पाईनब्रिज इंडिया युएस इक्विटी फंड या योजनेचे निधी व्यवस्थापक विक्रांत मेहता म्हणाले, 'भारतात रुपया परिवर्तनीय नाही. दोन वर्षांनी तुम्हाला मोठी रक्कम डॉलरमध्ये खर्च करायचा तुमचा विचार आहे आणि तुम्ही रुपयाच्या डॉलरबरोबरच्या विनिमय दरात वाढ अपेक्षित आहात म्हणून आज तुम्ही डॉलर खरेदी करून ठेवण्याचा तुमचा विचार असेल तर इथल्या कायद्यामुळे शक्य नाही. डॉलर खरेदी करताना रिझव्‍‌र्ह बँकेला डॉलर खरेदी करण्यामागची करणे देणे आवश्यक आहे. आधी दोन वर्षांपासून तुम्ही नुसते रोख डॉलर खरेदी करून ठेऊ शाणार नाही. अशा वेळी डॉलर मध्ये गुंतवणूक करणऱ्या योजनेत तुम्ही गुंतवणूक केलीत की आपोआप तुम्हाला असलेली विनिमयदाराची झळ कमी करता येऊ शकेल.'
डीएसपी ब्लँकरॉकचे विक्री विभाग प्रमुख असेलेल्या अजित मेनन यांच्या मते, डीएसपी ब्लॅकरॉक फंड घराण्याकडे असलेले कौशल्य, अंतरराष्ट्रीय अनुभव याच्या जोरावर हे फंड विकसित केले आहेत. योग्य वेळी योग्य फंडाचा उपयोग करण्यासाठी अशी उत्पादने समजून घेता यायला हवीत.
म्युच्युअल फंड विश्लेषक अतुल कोतकर यांच्या मते, गुंतवणूक साधनाचे प्राथमिक व दुय्यम असे दोन प्रकार आहेत. रुपया व्यतिरिक्त चलनात गुंतवणूक करणाऱ्या योजना या दुय्यम प्रकारच्या योजना आहेत. तुमच्या गुंतवणुकीत रुपया हे प्राथमिक चलन असलेल्या योजना ८०% असावे तर डॉलर युरो व येन ही ज्या योजनांची प्राथमिक चलने आहेत अशा योजना २०% असाव्यात. २००८ ते २०१२ या कालावाधीत डॉलरची अन्य चलनाच्या तुलनेत घसरणच होत होती. अशा वेळी डॉलरमध्ये मालमत्ता असणाऱ्या योजनांचा परतावा नकारात्मकच होता. समजा तुमचा मुलगा किंवा मुलगी परदेशात शिकायला जाणार असेल तर दोन तीन वष्रे आधीपासून अशा योजनात गुंतवणूक करावी. म्हणजे मे ते सप्टेंबर २०१३ या काळात अनपेक्षित रुपयाची घसरण झाली आणि अभ्यासक्रम सुरु होण्याच्या तोंडावर अनेकांची तारांबळ उडाली तशी उडणार नाही. परंतु प्रदीर्घ काळ आधीपासून अशा योजनांचा आधार घेऊ नये.

हट्टाग्रह मागे

प्रा. नीरज हातेकरांचे निलंबन रद्द 

उपस्थित मुद्द्यांचाही होणार अभ्यास 

म. टा. प्रतिनिधी, मुंबई 

शैक्षणिकच नव्हे तर सामाजिक तसेच राजकीय वर्तुळातही उमटलेल्या असंतोषातून धडा घेत अखेर मुंबई विद्यापीठाने हट्टाग्रह सोडून अर्थशास्त्र विभागाचे प्रा. नीरज हातेकर यांचे निलंबन मागे घेतले. शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या प्रदीर्घ बैठकीनंतर रविवारी पहाटे तीनच्या सुमारास मॅनेजमेंट कौन्सिलने हा निर्णय घेतला. हातेकर यांना पुन्हा वर्गावर घेतानाच, त्यांनी उपस्थित केलेल्या १६ मुद्द्यांची सखोल अभ्यास करण्यासाठी मुंबई हायकोर्टाचे माजी न्यायमूर्ती डी. जी. देशपांडे यांची नियुक्तीही करण्यात आली. 

मुंबई विद्यापीठाच्या विरोधात पत्रकार परिषद घेऊन प्रा. नीरज हातेकर यांनी १६ मुद्द्यांच्या आधारे प्रशासनावर टीका केली होती. यावेळी त्यांनी कुलगुरू डॉ. राजन वेळूकर यांच्यावरही निशाणा साधला होता. त्यामुळे शिस्तभंगाची कारवाई करत विद्यापीठातर्फे निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मात्र याविरोधात शैक्षणिक-सामाजिक-राजकीय क्षेत्रातूनही विद्यापीठ प्रशासन व विशेषत: कुलगुरू लक्ष्य होऊ लागले. अखेरीस शुक्रवारी राज्यपाल के. शंकरनारायण यांनी कुलगुरू डॉ. राजन वेळूकरांना कानपिचक्या देत हा प्रश्न तत्काळ संपवण्याचा आदेश दिला. या आदेशाबरहुकूम कुलगुरूंनी शनिवारी मॅनेजमेंट कौन्सिलची बैठक बोलविली. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या बैठकीत अखेर हातेकरांचे निलंबन मागे घेण्याची शिफारस सर्व सदस्यांनी एकमताने केली व ती मंजूर झाली. 

मुख्य म्हणजे, नीरज हातेकर यांनी केलेल्या १६ मुद्द्यांत तथ्य नसल्याचे विद्यापीठाचे म्हणणे आहे. तरीही विद्यार्थीहित लक्षात घेता, या प्रश्नांची चौकशी होणे गरजेचे असल्याने या सर्व प्रश्नांची विभागीय चौकशी करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला असून त्यासाठी माजी न्यायमूर्ती डी. जी. देशपांडे यांची नेमणूक करण्यात आली आहे. 

विद्यार्थ्यांचा आज विजयी मोर्चा 

हातेकरांच्या पाठी उभे राहात निदर्शने, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. हातेकरांच्या पुनर्प्रवेशाचा आनंद साजरा करण्यासाठी विद्यार्थी आज, सोमवारी कलिना कॅम्पस येथे विजयी मोर्चा काढणार आहेत. 

माझे निलंबन बेकायदेशीर असल्याचे मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे. ते मागे घेण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. मी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर चौकशीसाठी नेमण्यात आलेली समिती योग्य ती निष्कर्ष काढेल. त्याचा विद्यार्थीवर्गाला नक्कीच फायदा होईल आणि गेल्या अनेक वर्षांपासून प्रलं​बित असलेले प्रश्न सुटतील. 

- प्रा. नीरज हातेकर, अर्थशास्त्र विभाग

Monday, December 23, 2013

MPSC PRELIMS 2014-प्रश्नमंजुषा

१)सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच दिलेल्या एका महत्वपूर्ण निकालानुसार खालीलपैकी कोणाला घरगुती हिंसा संरक्षण अधिनियम 2005 (Domestic Violence Act 2005)चा लाभ मिळणार नाही?

A. घटस्फोटीत पुरुषांबरोबर राहणार्या महिला
B. विवाहित पुरुषांबरोबर लिव्ह-इन-रिलेशन मध्ये राहणार्या महिला 
C. लिव्ह-इन-रिलेशन मधील सर्व महिला
D. अल्पवयीन मुलांचा बाप असणार्या घटस्फोटीत पुरुषांबरोबर राहणार्या महिला



२) १0000 डॉलर्स इनामाचे 'फ्युचर्स टेनिस टूर्नामेंट २०१३ ' च्या पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी प्राप्त केले?
A. महेश भूपती
B. लिअँडर पेस
C. हमवतन सनम सिंह
D. रामकुमार रामनाथन


३) राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?
A. न्या. के. जी. बालकृष्णन
B. न्या. एस. राजेंद्रबाबू
C. न्या. बी. एन. किरपाल
D. महम्मद शप्पी कुरेशी



४) देशाच्या महालेखापदी (CAG) कोणाची नियुक्ती करण्यात आली?
A. विनोद रॉय
B. के. व्हि. कामत
C. शशीकांत शर्मा D. नीलकांत शर्मा



५) 'महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहीम ' महाराष्ट्र शासनाने केव्हा सुरु केली?
A. 15 ऑगस्ट 2007
B. 15 ऑगस्ट 2008
C. 15 ऑगस्ट 2009
D. 15 ऑगस्ट 2010



६) धनुष क्षेपणास्त्र हे कोणत्या भारतीय क्षेपणास्त्राची नौदलासाठी विकसित केलेले आवृत्ती आहे?

A. अग्नी-1
B. पृथ्वी C. त्रिशुल
D. आकाश


७) नेपाळमध्ये संविधान सभेसाठी नोव्हेंबर २०१३ मध्ये झालेल्या निवडणुकीत सर्वात जास्त जागा कोणत्या पक्षाला मिळाल्या?

A. युसीपीएन (माओवादी)
B. नेपाळी कम्युनिस्ट पार्टी
C. नेपाळी कॉंग्रेस पार्टी
D. राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टी



८) तिहरी जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर स्थित आहे?

A. यमुना
B. ब्रम्हपुत्रा
C. भागीरथी
D. सिंधू



९) भारतात 'प्रवासी भारतीय दिन ' कधी साजरा केला जातो?

A.  नोव्हेंबर
B.  डिसेंबर
C.  जानेवारी
D.  फेब्रुवारी



१०) १ डिसेंबर २०१३ रोजी झालेली २८ वी 'पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन' स्पर्धा पुरुष महिला दोन्ही वर्गात कोणत्या देशाच्या धावपटूंनी जिंकली?


A. केनिया
B. इथोपिया
C. अमेरीका
D. भारत