Showing posts with label अर्थशास्त्र. Show all posts
Showing posts with label अर्थशास्त्र. Show all posts

Tuesday, September 3, 2013

आपलाच दाम खोटा!

रूपया का घसरला त्याचे चांगले वाईट परिणाम - अभ्यास लेख

उदारीकरण आणि नव्या आर्थिक व्यवस्थेचे सूतोवाच करून २२ वर्षे झाली तरी थेट परकीय गुंतवणूक अवघी पावणेदोन टक्केच असते.. रुपयाच्या घसरणीचा फायदाच निर्यातप्रधान क्षेत्रांना होऊ शकेल, ही शक्यता खरी असली तरी मुळात निर्यात कमीच राहिलेली असते.. उद्योगांना किफायतशीर कर्जे मिळवण्यासाठी देशाबाहेरच पाहावे लागते.. हे असे अर्थकारण असेल तर रुपया गडगडणे क्रमप्राप्त होते, ही वस्तुस्थिती मांडणारा लेख..
रुपयाच्या घसरणाऱ्या दराचा प्रश्न आíथक-साक्षर असलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला मे २०१३ पासून भेडसावत असताना २८ ऑगस्ट रोजी तो डॉलरच्या तुलनेत ६९ पर्यंत घसरला. मुळात आपल्या देशातील एकूण साक्षरतेचा दर ६६ टक्क्यांच्या आसपास स्थिरावला. देशाच्या महत्त्वाच्या प्रश्नाच्या बाबतीत सजगता दाखविली जात नाही ही बाब अर्थातच लोकांना त्रासदायक ठरते, तसे परिणामही दिसू लागले आहेत. रुपयाच्या घसरणीचा प्रत्यक्ष दुष्प्रभाव अर्थव्यवस्थेच्या सर्वच स्तरांवर पडताना दिसतो आहे, तो अगदी उद्योजकापासून सर्वसामान्यापर्यंत! रुपयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलरची वधारणारी किंमत रिझव्र्ह बँक व केंद्र सरकारच्या दृष्टीने डोकेदुखी ठरत असल्याने घसरण रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अर्थात वेळेत घ्यावयाची काळजी घेताना दोघेही दिसत नाहीत. देशाची मध्यवर्ती बँक मलमपट्टी धाटणीची धोरणे राबवून, उपाययोजनांची अंमलबजावणी धिम्या गतीने करताना दिसत आहे. देशाचे माननीय पंतप्रधान व वित्तमंत्री घाबरण्याचे कारण नसल्याची ग्वाही देत आहेत.
भारताच्या चलनाबरोवर ‘ब्रिक’ देशसमूहातील आणि इतरही एकेकाळी नावाजलेल्या देशात त्यांच्या चलनाची घसरण झालेली आढळते. यात प्रामुख्याने रशिया- ५.४८, दक्षिण आफ्रिका- ६.४%, मलेशिया- ८.३८%, दक्षिण कोरिया- ५७%, इन्डोनेशिया- ९.३%, आस्ट्रेलिया- ७.८%, फिलिपाइन्स- ६.२% आणि थायलंड- ६.३८% या सर्व अर्थव्यवस्थांच्या चलनात घट झाली असली तरी भारताच्या रुपयात २०१२ च्या डॉलर-रुपया विनिमय दराच्या तुलनेत २१.६६% ने घट झाली. अर्थात मागच्या तीन महिन्यांत १५.६६% घसरला. चलनविनिमय दराचे अरिष्ट केवळ भारताच्या नशिबी आले आहे असे विरोधी पक्ष आवेशाने दाखवीत असला तरी त्यांनी त्यांची दृष्टी व्यापक ठेवावी. भारताबरोबर इतरही देशांच्या चलनाची पडझड होण्याची कारणे थोडय़ाफार फरकाने भिन्न असली तरी त्यात मुख्य कारण आहे ते अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत काही प्रमाणात सुधार दिसत आहे. अमेरिकन सरकारच्या दहा वर्षांवरील ट्रेझरी कर्ज रोख्यावरील व्याजाचे दर १०.४३ टक्क्यांवरून २.८८ टक्क्यांवर जाऊन पोहोचल्यामुळे आशिया खंडातील परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणुकीचा ओघ अमेरिकेकडे वळविला. अमेरिकन फेडरल रिझव्र्ह बँकेमार्फत रोखे खरेदीकरण कार्यक्रम गुंडाळला जाण्याच्या बातमीने बँका व आयात व्यापाऱ्यांकडून मोठय़ा प्रमाणावर मागणी नोंदविण्यात आली. परिणामी, भांडवली बाजार मुंबईचा निर्देशांक ७०० अंशांनी घसरून १८ हजारांवर नोंदला गेला. भारतीय अर्थकारण श्रावणातील काळ्या ढगांप्रमाणे आíथक सावटाखाली झाकोळून गेले.
डॉलर-रुपया विनिमय दर २०१३ मध्येच प्रतिकूल झाला असे नाही, तर १९७५ पासूनच हा दर ८.४१ वरून १९९५ मध्ये ३२.४३ आणि २००१ ला ४७.२३, तर २०१२ पर्यंत ५३.३४ रुपयांवर होता. नवीन अíथक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून रुपयाचे डॉलरच्या तुलनेतील मूल्य निव्वळ ३२.०७ ने घटले, तर शेकडेवारीत ९८.८८ ने घटले. जागतिक स्तरावर इतकी मोठी किंमतहानी भारताव्यतिरिक्त कुठल्या चलनाची झाली नसेल. चलनदरात घट होण्याची कारणे अनेक असली तरी भारताच्या व्यापारतोलातील कायमची कमालीची तूट कमी करण्यात आपण कमी पडतो आहोत. निर्यातवृद्धी धोरणांची वानवा नसून जागतिक व्यापार संघटनेच्या काही सदस्य देश विकसनशील देशांकडून होणाऱ्या निर्यातक्षमतेत आडकाठी निर्माण करीत आहेत. व्यापारतोलाची दुसरी बाजू आयात आपली डोकेदुखी ठरत आहे. आयात पर्यायीकरण धोरण राबवून आयातीला सक्षम पर्याय निर्माण न केल्यामुळे व्यापारतोलातील तूट वाढतच आहे. उदारीकरण धोरणाने आयातवृद्धीला खतपाणी घातले आहे. याचा परिणाम रुपया अजूनच घसरण्यावर होतो आहे. अमेरिकेत २००८ मध्ये आलेले आíथक अरिष्ट व त्याची व्याप्ती युरोपात पोहोचल्यामुळे भारताच्या निर्यात व्यापारात काही प्रमाणात घट झाली असून त्यात अजून अपेक्षित सुधार आलेला नाही. ही बाब रुपयाचे विनिमय मूल्य घसरणीला जबाबदार ठरली आहे.
मागील चार वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था समग्र आíथक निर्देशकाच्या बाबतीत पिछाडीवर गेल्यामुळे सार्वभूम पतमापन घसरण्याचा धोका वाढत आहे. राज्यकोशीय तुटीचे प्रमाण स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाशी ४.९ टक्क्यांवर असून भारताच्या व्यवहारतोलातील चालू खात्यावरील तूट ४.८ टक्के आहे. स्थूल राष्ट्रीय उत्पन्नवाढीचा वार्षकि वेग पाच टक्क्यांपर्यंत आला आहे. अर्थात हा वेग अमेरिका व युरोपीय अर्थव्यवस्थेच्या वार्षकि वाढीच्या तुलनेत चांगला असला तरी मूलभूत निकषाच्या बाबतीत मागे आहे. भारतावर असलेल्या परकीय कर्जाचा बोजा ३९० हजार अब्ज डॉलर असून हे प्रमाण ठोकळ राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपी) २१ टक्के इतके आहे.

भारतातील काही नामवंत कंपन्यांनी परकीय चलनात उभारलेली अल्पकालीन कर्जे, ज्यांची परतफेड एक वर्षांच्या आत करावयाची आहे, या कर्जाचे प्रमाण जीडीपीच्या ४.५ टक्के असले तरी सरकारची डोकेदुखी ठरली आहे. उदारीकरण कार्यक्रमाअंतर्गत कंपन्यांनी बाहेरील देशांतूनही कर्जे उभारणे अपेक्षित असले, तरी भारताच्या बाबतीत ते घडत नाही.. घडलेच तरी न परवडणाऱ्या दरांतली देशी कर्जे कोण घेणार?
रुपयाची घसरण चिंता वाढविणारी बाब असली तरी काही निर्यातप्रधान उद्योगांच्या बाबतीत फलदायी ठरू शकते. आयटी, सॉफ्टवेअर निर्यात, अभियांत्रिकी व वाहन उद्योग, कृषी उत्पादने अथवा कृषी आधारित अन्नप्रक्रिया उद्योग अशा क्षेत्रांना हा फायदा होईल. सर्वसामान्यांच्या जीवनमानात मात्र या उ:शापामुळे फरक पडत नाही. उलट प्रतिकूल परिणामांच्या झळाच सर्वसामान्यांना सोसाव्या लागणार. पेट्रोलियम उत्पादनाच्या किमती गेल्या तीन महिन्यांपासून वाढत असून त्याचा परिणाम वाहतूक खर्च वाढण्यात होतो आहे. ही बाब महागाईचा दर वाढविणारीच आहे आणि राहील. याशिवाय कृषिखते, खाद्यतेल, औषधे, मोटारी, इलेक्ट्रिक / इलेक्टॉनिक वस्तू महाग होत आहेत. यामुळे महागाई नियंत्रित करण्याचे प्रयत्न निष्फळ ठरत आहेत. पुन्हा महागाई नियंत्रित करण्यासाठी महाग वित्तीय धोरण राबण्याची गरज निर्माण झाली तर कर्जावरील व्याजाचे दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी, अगोदरच आलेल्या औद्योगिक क्षेत्रातील मरगळीत भर पडू शकते.
सोन्याच्या बेसुमार आयातीमुळे रुपयाचे पानिपत होण्यास मदत झाली असल्याने सोने आयातीवर र्निबध आणण्याचा भाग म्हणून आयात शुल्क १२ टक्क्यांवर गेले आहे. ते आणखी वाढण्याची शक्यता पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सूचित केली आहे.

रुपयाची पडझड रोखण्यासाठी रिझव्र्ह बँकेने गेल्या सहामाहीत परिस्थिती किमान आणखी ढासळणार नाही, याची काळजी घेतली. परंतु हे प्रयत्न काळजीवाहूच होते. केंद्र सरकारने उशिराने पावले उचलयाला सुरुवात केल्यामुळे मागील तीन महिन्यांत रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत घसरतच गेली. रिझव्र्ह बँक राबवत असलेल्या उपायांपकी बँकांची अतिरिक्त रोखता काढून घेणे, डॉलरची विक्री करणे, डॉलर खरेदी करणाऱ्या तेल कंपन्या, उद्योजक, आयातदार, उद्योगसंस्था, सटोडिये व व्यक्ती यांच्या व्यवहारांवर नियंत्रण आणणे व इतर उपाय पुरेसे ठरलेले दिसत नाहीत. खरेतर सोन्याच्या आयातीवर कडक र्निबध आणून त्याच्या खरेदीदारावर उत्पन्न कर विभागाने नजर ठेवण्याची गरज आहे. परकीय चलनाचा ओघ वाढविण्यासाठी अनिवासी भारतीयांच्या ठेवी आकर्षति करण्यासाठी कर सवलतीचा वर्षांव करणेही गरजेचे आहे. भारतीय भांडवल आणि कर्जरोखे बाजारातून मागील एक वर्षांत ११ अब्ज डॉलरची गुंतवणूक देशाबाहेर गेली आहे. गुंतवणूक निर्गमनाचे हे प्रमाण विक्रमीच म्हणावे लागेल. अशा स्थितीत परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांना माघारी फिरविण्यासाठी नवीन सवलती जाहीर करणे आवश्यक ठरते.
अर्थव्यवस्थेवरील विश्वासवृद्धीसाठी धोरणे आखून त्यांची अंमलबजावणी शीघ्र गतीने करणे, प्रशासकीय सुधारणा राबविणे, भ्रष्टाचार कमी करणे इत्यादी उपाय केले तरच परकीय चलन गंगाजळीत वाढ होईल. नवीन आíथक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर २२ व्या वर्षीसुद्धा परकीय थेट गुंतवणुकीचे भारतातील प्रमाण जीडीपीच्या केवळ १.७५ टक्क्यांपर्यंत गेले, याचा सरळ अर्थ केलेल्या सुधारणा पुरेशा नसून यापुढेही सुधारणा कराव्या लागतील. ११९१च्या दिशेने अर्थव्यवस्थेची वाटचाल होत नसली तरीही घसरत्या रुपयाचे मूल्य अर्थव्यवस्थेच्या आजारपणाचे लक्षण समजून त्याला गांभीर्याने सामोरे गेले पाहिजे.

Sunday, September 1, 2013

सरकारचा अर्थव्यवस्थेत हस्तक्षेप का आवश्यक असतो???

"" जे सरकार देशाच्या आर्थिक जीवनात कमीत कमी हस्तक्षेप करते ते सरकारचांगले "" ( ""That Government is the best Government which governsLeast"") अशी समजूत अठराव्या शतकात सर्वत्र प्रचलित होती. ह्या विचारानुसारसरकारच्या कार्याचे क्षेत्र अत्यंत मर्यादित होते. त्याकाळी लोकप्रिय असलेला हा विचारआता संपूर्णपणे लुप्त झालेला आहे. Lassez Faire ह्या आर्थिक धोरणाचे माहेरघरसमजल्या जाणाऱ्या इंग्लंडमध्ये सुध्दा अर्थशास्त्रज्ञांचा, राजकीय पुढाऱ्यांचा व जनतेचात्यावर विश्वास राहिलेला नाही. अनिर्बंध भांडवलशाही उत्पादन प्रणालीचा परमोच्चविकास जसा विसाव्या शतकात झाला तसेच ह्या उत्पादनप्रणालीतले सर्व दोषहीविसाव्या शतकाच प्रकर्षने प्रकाशात आलेत. भांडवलशाही अर्थव्यवस्था ही एक अपूर्णव्यवस्था आहे ही गोष्ट आज कुणीही अमान्य करणार नाही. भांडवलशाही अर्थव्यवस्थे-मधील काही महत्त्वाच्या दोषांबद्दल ह्यापूर्वीच चर्चा केली आहे. हे दोष दूर करूनआर्थिक जीवन सुरळीत करण्याकरिता, देशाचा आर्थिक विकास झपाट्याने करण्या-करिता, सर्व प्रदेशांचा संतुलित विकास गडवून आणण्याकरिता आणि सामान्य जनतेलाआर्थिक व समाजिक न्याय मिळवून देण्याकरिता सरकारने अर्थव्यवस्थेत हस्तक्षेप करणेही अत्यावश्यक व अनिर्वाय बाब बनली आहे.


सरकारने अर्थव्यवस्थेत हस्तक्षेप करण्याची आवश्यकता


सध्याच्या परिस्थिती सरकारने अर्थव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करण्याच्या आवश्यकते-बद्दल पुढे विस्तृत चर्चा केली आहे.



1) आधारभूत सेवा प्रदान करणे- प्रत्येक समाजाला काही आधारभूत सेवा,सोयी व सवलती आवश्यक असतात. व्यक्तीचे किंवा खाजगी संस्थेचे उद्दिष्ट जास्तीत-जास्त नफा मिळविण्याचे असल्यामुळे समाजाला हया आधारभूत सेवा उपलब्ध करूनदेण्याची कामगिरी व्यक्तींकडे किंवा खाजगी संस्थांकजे सोपविता येत नाही. समाजाचीसुरक्षितता, आरोग्य, स्थायित्व, विकास आणि कल्याणाच्या दृष्टिकोनातून आधारभूतसेवा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सरकारने स्वीकारणे इष्ट असते. सरकारनेदेशाच्या अर्थकारणात हस्तक्षेप केल्याशिवाय समाजाला आवश्यक असलेल्या मूलभूतसेवा उपलब्ध होऊ शकत नाहीत.


2) महत्त्वाच्या उद्योगांवर सरकारचे नियंत्रण ठेवणे- संपूर्ण समाजाचे हितसुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने काही उद्योगांची मालकी व नियंत्रण सरकारकडेच असणेआवश्यक असते. उदा. संरक्षण सामग्रीचे उत्पादन करणारे कारखाने. असे उद्योगव्यक्तींच्या किंवा खाजगी संस्थांच्या ताब्यात असल्यास समाजाची सुरक्षितता व हितधोक्यात येते


3) औद्योगिक विकासाचा वेग वाढविणे- ज्या देशाच्या अर्थव्यवस्थेत सरकारहस्तक्षेप करीत नाही अशा देशाचा औद्योगिक विकास फार मंद गतीने घडून येतो.अर्थकारणात स्थितिशील वातावरण कायम टिकून राहण्याची भीती असते. मंदीच्याकाळात तर अनेक उद्योग बंद पडतात आणि त्यामुळे लक्षावधी कामगारांवर बेकारीचेसंकट कोसळते. ज्या उद्योगांमध्ये महत्तम नफा मिळण्याची शाश्वती असते, अशाउद्योगांची स्थापना करण्यातच भांडवलदार पुढाकार घेतात. प्रत्येक देशाचा औद्योगिकविकास मूलभूत उद्योगांच्या ( Basic Industries) प्रगतीवर अवलंबून असल्यामुळेआणि अशा उद्योगांच्या स्थापनेमध्ये खाजगी भांडवलदार पुढाकार घेत नसल्यामुळे, हीजबाबदारी सरकारनेच स्वीकारायला हवी. सुदृढ पायावर देशाचे औद्योगीकरण करणेआणि औद्योगिक विकासाचा वेग वाढविणे, ही सरकारी हस्तक्षेपाची मुख्य उद्दिष्टेमानली जातात.


4) संतुलित औद्योगीकरण साध्य करणे- खाजगी भांडवलदारांना कोणत्याहीउद्योगात फायदा मिळवण्याची हमी हवी असते. ज्या उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावरभांडवलाची आवश्यकता असते, जेथे भांडवलाची गुंतवणूक केल्यानंतर उत्पादनाचे कार्यसुरू होण्याकरिता बराच काळ लागतो, जेथे उत्पादित वस्तूंकरिता सुरक्षित व विस्तृतबाजारपेठ नसते व जेथे विविध प्रकारची जोखीम अस्तित्वात असते, अशा उद्योगांमध्येभांडवल गुंतविण्याकरिता खाजगी भांडवलदार सहसा तयार होत नाहीत. देशाचेऔद्योगीकरण व औद्योगिक विकास संतुलित रीतीने घडून यावा ह्याकरिता आणिग्राहकांना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्याकरिता अशा उद्योगांची उपेक्षा करणेमुळीच योग्य नसते. ज्या उद्योगामध्ये भांडवलाची गुतंवणूक करण्याकरिता भांडवलदारतयार नसतात किंवा समर्थ नसतात, असे उद्योग देशात स्थापन करण्यासाठी सरकारनेपुढाकार घेणे आवश्यक असते.



5) सरकारचे उत्पन्न वाढविणे- देशात कल्याणकारी राज्य निर्माण करण्याचाप्रयत्न करणाऱ्या सरकारला लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सर्व क्षेत्रांत बराच खर्चकरावा लागतो. वॅगनर यांनी प्रतिपादन केलेल्या  सिद्धांतानुसार ( Wagner's Lawof increasing state activities) सरकारच्या कार्याचा सखोल व विस्तृत अशादोन्ही पद्धतींना वाढण्याची प्रवृत्ती असते. ह्या कारणामुळेच सार्वजनिक खर्चामध्ये( Public Expenditure) सतत वाढ होत जाते. हा खर्च करण्यासाठी सरकारच्याउत्पन्नातही सतत वाढ व्हायला हवी. हा खर्च करण्यासाठी सरकारला लागणारा पैसाप्राप्त करण्यासाठी काही लाभदायक उद्योगांवर सरकार स्वतःचे नियंत्रण ठेवते व असेउद्योग स्वतः चालविते. सरकारच्या उत्पन्नात वाढ करणे हेसुद्धा सरकारी हस्तक्षेपाचेएक उद्दिष्ट असू शकते.


6) अविकसित प्रदेशांचा आर्थिक विकास घडवून आणणे. : प्रत्येक देशात काहीप्रदेश अत्यंत अविकसित असतात. अविकसित प्रदेशांमध्ये उद्योगांच्या स्थापनेकरिता वविकासाकरिता तसेच व्यवसायाच्या संचालनाकरिता आवश्यक असलेल्या सोयींचा वसवलतींचा अभाव असतो. ह्या कारणांमुळेचच खाजगी भांडवलदार तेथे आपल्या भांडवल-लाची गुतंवणूक करून जोखीम स्वीकारण्यासाठी तयार होत नाहीत. अविकासितप्रदेश त्याच अवस्थेमध्ये वर्षानुवर्षे राहण्याचे हेच कारण आहे. अविकसित प्रदेशातएखादा मोठा उद्योग स्थापन झाल्यास नंतर तेथे काही पूरक उद्योगांची स्थापनाहोते, व्यापार वाढीला लागतो, कुशल कामगार आकृष्ट होतात, बाजारपेठा संघटितहोतात आणि अशा रीतीने आर्थिक विकासाच्या प्रक्रियेला तेथे चालना मिळते. अवि-कसित प्रदेशात मोठे उद्योग किंवा प्रकल्प स्थापन करण्यासाठी सरकारने अर्थव्यवस्थेतप्रत्यक्षपणे ह्सतक्षेप करणे आवश्यक असते.


7) आर्थिक सत्तेचे केन्द्रीकरण टाळणे : उत्पादनाच्या साधनांवर मूठभरव्यक्तीचा मालकी व नियंत्रण हे भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे एक ठळक वैशिष्ट्य असते.उद्योगांवरील व्यक्तिगत मालकीमुळे ह्या उद्योगांचा संपूर्ण लाभ समाजातील मूठभरसधन व्यक्तींना मिळतो. त्यामुळे आधीच श्रीमंत असलेल्या व्यक्ती अनेक पटींना श्रीमंतहोतात व आर्थिक सत्तेचे केन्द्रीकरण घडून येते. आर्थिक सत्तेचे केन्द्रीकरण झाल्यासमक्तेदारी प्रवृत्तीची वाढ होते आणि मूठभर व्यक्ती संपूर्ण बाजारपेठेवर आपला ताबामिळवितात. आर्थिक, सामाजिक आणि राजकीय अशा तिन्ही दृष्टिकोनांतून आर्थिकसत्तेचे केन्द्रीकरण घडून येणे हानिकारक असते. आधुनिक काळात सरकारने अर्थव्यव-स्थेत हस्तक्षेप केल्याशिवाय आर्थिक सत्तचे केन्द्रीकरण टाळले जाऊ शकत नाही.


8) आर्थिक विषमतेची दरी कमी करणे : व्यक्तींच्या उत्पन्नामध्ये अंतर राहणेआवश्यक आहे, योग्य आहे व समर्थनीय पण आहे. परंतु उत्पन्नवितरणातील हीविषमता योग्य मर्यादेपर्यतच असली पाहिजे. कोणत्याही समाजात उत्पन्नवितरणा-

अर्थशास्त्रविषयक संज्ञा :


अर्थशास्त्रविषयक संज्ञा :

अर्थशास्त्रीय लेखनास वारंवार येणाऱ्‍या काही संज्ञांचे अर्थ पुढीलप्रमाणे विशद केलेले आहेत. सर्व संज्ञांचे अर्थ स्थलाभावी देता येणे अशक्य असल्याने, ज्या संज्ञांचा अर्थ कळावयास सुगम आहे, त्या संज्ञांचा समावेश सामान्यपणे करण्यात आलेला नाही. त्याचप्रमाणे काही महत्त्वाच्या संज्ञांचे संक्षिप्त अर्थ खाली दिले असले, तरी त्यांतील काहींच्या स्वतंत्र नोंदीही इतरत्र समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत.

अंतर्गत काटकसरी (इंटर्नल इकॉनॉमीज) : उत्पादन-संस्थेचे आकारमान वाढल्यामुळे होणाऱ्‍या खर्चातील बचती.

अंतर्मूल्य (इंट्रिझिक व्हॅल्यू) : चलन ज्या वस्तूवर वा धातूवर मुद्रित केलेले असते त्या वस्तूचे वा धातूचे मूल्य.

अंशनियोजन (पार्शल प्लॅनिंग) : अर्थव्यवस्थेतील काही भागाचे नियोजन करून इतर भाग सामान्यपणे नियोजनाच्या कक्षेबाहेर ठेवणे.

अतिरिक्त लोकसंख्या (ओव्हरपॉप्युलेशन) : पर्याप्त लोकसंख्येपेक्षा अधिक असलेली लोकसंख्या.

अधिमूल्यन (ओव्हरव्हॅल्युएशन) : क्रयशक्ति-समानता सिद्धांताप्रमाणे योग्य असणाऱ्‍या विदेश-विनिमय-दरापेक्षा आपल्या चलनाचा दर अधिक ठेवणे. यामुळे निर्यात घटते व आयात वाढते.

अनुप्रयुक्त अर्थशास्त्र (अ‍ॅप्लाइड इकॉनॉमिक्स) : अर्थशास्त्रीय सिद्धांतांच्या व्यावहारिक उपयोगांचा अभ्यास.

अप्रत्यक्ष कर : ज्या करांच्या बाबतीत करदात्याला ते कर स्वतः न भरता करभार दुसऱ्यावर ढकलणे शक्य असते, अशा प्रकारचे कर. उदा., विक्रीकर, उत्पादन-कर.

ð अर्थसंकल्प (बजेट) : आगामी वर्षाच्या कालखंडातील आपल्या आय - व व्यय-विषयक अपेक्षा व धोरण व्यक्त करणारे शासनाने तयार केलेले अंदाजपत्रक.

अर्धविकसित अर्थव्यवस्था (अंडरडेव्हलप्ड इकॉनॉमी) : ज्या अर्थव्यवस्थेत काही प्रमाणात औद्योगिक विकास झालेला आहे, अशी अर्थव्यवस्था. अर्थविकसित ही सापेक्ष संकल्पना आहे.

ð अवमूल्यन (डिव्हॅल्युएशन) : आपल्या चलनाचे परकीय राष्ट्राच्या चलनाच्या तुलनेत मूल्य कमी करणे. यामुळे परदेशातील वस्तू महाग होतात व आयात कमी होते आणि आपल्या वस्तू परकीयांना स्वस्त झाल्यामुळे निर्यात वाढते.

अवरुद्ध खाती (ब्लॉक्ड अकाउंट्स) : ज्या खात्यांतील रकमा काढून घेण्यास प्रतिबंध केला जातो अशी खाती.

अविकसित अर्थव्यवस्था (अनडेव्हलप्ड इकॉनॉमी) : ज्या अर्थव्यवस्थेत आर्थिक विकास झालेला नाही, अशी अर्थव्यवस्था. या अर्थव्यवस्थेत उद्योगधंद्यांचा विकास झालेला नसतो व शेतीही मागासलेलीच असते.

ð आंतरराष्ट्रीय देवघेवींचा ताळेबंद (बॅलन्स ऑफ पेमेंट्स) : निर्यात केलेल्या विविध वस्तू व सेवा यांच्यासाठी राष्ट्राला मिळावयाची रक्कम व अशाच आयातीसाठी राष्ट्राने द्यावयाची रक्कम यांचा ताळेबंद. हा प्रतिकूल असेल, तर राष्ट्राला तेवढे सुवर्ण निर्यात करावे लागते किंवा तेवढी तरतूद करण्यासाठी परकीय राष्ट्राकडून किंवा आंतरराष्ट्रीय चलननिधीसारख्या संस्थेकडून कर्ज मिळवावे लागते.

ð आंतरराष्ट्रीय व्यापारदर (टर्म्स ऑफ ट्रेड) : एखादे राष्ट्र आयात करीत असलेल्या वस्तूंच्या किंमतींची पातळी व निर्यात करीत असलेल्या किंमतींची पातळी यांमधील परस्परसंबंध. आयात मालाचे भाव चढले परंतु निर्यात मालाचे पूर्वीचेच राहिले, तर पूर्वीइतकीच आयात करण्यासाठी अधिक निर्यात करावी लागते, व व्यापारदर त्या राष्ट्राविरूद्ध गेला आहे असा निर्देश केला जातो.

ð आंतरराष्ट्रीय व्यापारसंतुलन (बॅलन्स ऑफ ट्रेड) : दोन राष्ट्रांतील वस्तूंच्या आयातनिर्यातीच्या एकूण मूल्याचे संतुलन. यात सेवांच्या आयातनिर्यातीचा समावेश नसतो.

आयातकोटा (इंपोर्ट कोटा) : कोणती वस्तू किती आयात करता येईल, ह्या दृष्टीने घातलेली मर्यादा.

आर्थिक मानव (इकॉनॉमिक मॅन) : केवळ आर्थिक प्रेरणांनुसार व्यवहार करणारा अर्थशास्त्रज्ञांनी कल्पिलेला मानव.

इतर परिस्थिती कायम राहिल्यास (सेटेरिस पॅरिबस) : तात्त्विक आर्थिक सिद्धांत व्यवहारात अनुभवास येणे हे विशिष्ट परिस्थितीच्या अस्तित्वावर अवलंबून असल्यामुळे त्यांची परिस्थिति-सापेक्षता दर्शविणारा वाक्प्रचार.

उतरत्या प्रतिलाभाचा नियम (लॉ ऑफ डिमिनिशिंग रिटर्न्स) : इतर उत्पादन-घटकांचे प्रमाण पूर्वीचेच ठेवून एखाद्या घटकाचा अधिकाधिक वापर केल्यास त्या घटकाच्या वापरल्या जाणाऱ्‍या नगांस उत्तरोत्तर कमी कमी उत्पादनफल मिळत जाते, हे तत्त्व.

उत्थान (टेक-ऑफ) : परकीयांच्या मदतीखेरीज स्वयंगतीने पुढील विकास चालू ठेवण्याची अर्थव्यवस्थेची क्षमता.

ð उत्पादन-संस्था (फर्म) : उत्पादन, व्यापार ह्या क्षेत्रांतील प्रवर्तक संघटना.

उत्पादनाचे घटक (फॅक्टर्स ऑफ प्रॉडक्शन) : उत्पादनप्रक्रियेस आवश्यक असलेले जमीन, श्रम, भांडवल आणि संघटन हे साधन-घटक.

उद्गामी कर (प्रोग्रेसिव्ह टॅक्सेस) : अधिक श्रीमंत वर्गावर उत्तरोत्तर वाढत्या दराने आकारले जाणारे कर.

ð उद्योग (इंडस्ट्री) : एकाच प्रकारच्या वस्तूचे उत्पादन करणाऱ्‍या प्रवर्तक संघटनांचा समूह.

ð उपभोक्त्याचे संतोषाधिक्य (कंझ्यूमर्स सरप्लस) : वस्तूस अधिक किंमत देण्याची ग्राहकाची मानसिक तयारी असूनही, ती बाजारातील किंमतीप्रमाणे कमी दरात मिळाल्यामुळे ग्राहकाला मिळणारा अधिक संतोष.

उपभोक्त्याचे सार्वभौमत्व (कंझ्यूमर्स सॉव्हरिन्टी) : उत्पादनाला मागणी प्रेरणा देत असते व मागणी उपभोक्त्यांच्या इच्छेवर व क्रयशक्तीवर अवलंबून असते, या दृष्टीने उपभोक्ता हा सार्वभौम मानला जातो.

उपयुक्तता-मूल्य (यूस व्हॅल्यू) : वस्तूच्या पुरवठ्याचा विचार न करता, तिच्या केवळ उपयोगितेवर मापले जाणारे मूल्य.

ð उपयोगिता (युटिलिटी) : मानवी गरज भागविण्याची वस्तूची वा सेवेची शक्ती.

ऊर्ध्वाधर-संयोग (व्हर्टिकल इंटिग्रेशन) : उत्पादनातील विविध स्तरांतील क्रियांचे एकसूत्रीकरण.

ð औद्योगिक संबंध (इंडस्ट्रियल रिलेशन्स) : मालक व कामगार ह्यांचे परस्परसंबंध.

ðऔद्योगिक संयोजनीकरण (इंडस्ट्रियल रॅशनलायझेशन) : उद्योगधंद्याची वा अन्य आर्थिक क्षेत्राची नवीन तंत्रांच्या वा यंत्रांच्या साहाय्याने शास्त्रशुद्ध पुनर्रचना.

करदानक्षमता (टॅक्सेबल कपॅसिटी) : कर देण्याची कुवत. ही व्यक्तीच्या उत्पन्नावर व शासनाच्या धोरणाविषयी तिला वाटणाऱ्‍या उत्साहावर अवलंबून असते

नाणेबाजार

नाणेबाजार : अल्पमुदतीने भांडवल देणारे व घेणारे यांच्यातील व्यवहारांचा बाजार. ह्यात व्यापारी बँका, देशी पेढ्या व इतर अल्पमुदती भांडवल देणाऱ्या संस्थांचा आणि हुंडीबाजारातील दलाल, वायदेबाजारातील ग्राहक आणि विक्रेते, बँका व सरकार इ. अल्पमुदती भांडवल घेणाऱ्या लोकांचा व संस्थांचा समावेश होतो. नाणेबाजारातील उलाढालींचा पतपैशाच्या आणि एकूण पैशाच्या प्रमाणावर तसेच किंमतींच्या पातळीवर परिणाम होत असल्याने अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने नाणेबाजारातील व्यवहार महत्त्वपूर्ण ठरतात.

नाणेबाजाराचे स्थूलमानाने हुंडीबाजार, वायदेबाजारातील अल्पमुदतीच्या पैशाची देवघेव आणि बँकांचा व सरकारचा उसनवारी व्यवहार असे तीन विभाग पडतात.

हुंडी ही व्यापाराच्या सोयीकरिता कर्ज देण्याची व घेण्याची एक क्लृप्ती आहे. उत्पादकाला व्यापाऱ्याने माल घेतल्याबद्दल ठराविक मुदतीत पैसे परत करण्याचे वचन देणारा हा दस्तऐवज असतो. मालाच्या देवघेवीतून हुंडी उत्पन्न होत असल्याने मालाचे तारण धनकोस असतेच. शिवाय, हुंडीची मुदत सामान्यपणे ९० दिवसांची असते आणि ती वाढविता येत नाही. अशा हुंड्या विकणारे व विकत घेणारे व्यापारी, बँकांकडून ह्या हुंड्यांवर अत्यल्प मुदतीची कर्जे घेतात. म्हणून बँकांना आपले भांडवल ह्या हुंड्यांवर पैसे कर्जाऊ देऊन सोयीस्कर रीत्या गुंतविता येते.

वायदेबाजारात तेजीवाले व मंदीवाले यांचा उद्देश मालाच्या खरेदी-विक्री किंमतींमधील फरक खिशात टाकण्याचा असतो. ज्यांचे अंदाज हिशेबबंदीला खरे झाले नाहीत, त्यांस मालाची खरेदी-विक्री खरोखर करावी लागते किंवा किंमतींमधील फरक रोख भरावा लागतो. अशा वेळेस ते बँकांकडून कर्जे घेतात. ही कर्जे दलालांना किंवा गिऱ्हाइकांना प्रत्यक्षपणे दिली जातात. दलाल स्वतःची पत राखण्यासाठी कर्जे बुडवीत नाहीत. गिऱ्हाइकांकडून तारण घेण्यात येते म्हणून अशा प्रकारच्या भांडवल-गुंतवणुकीत बँकांना धोका नसतो.

दैनंदिन व्यवहारांत बँकांना रोकडीची टंचाई भासल्यास त्या इतर बँकांकडून २४ ते ४८ तासांच्या मुदतीने कर्जे घेतात. सरकारी तात्पुरती गरज भागविण्यासाठी तीन महिने मुदतीच्या सरकारी हुंड्या काढून बँकांकडून कर्ज घेते.

बँका आपले बरेचसे भांडवल वरील प्रकारांनी गुंतवीत असतात, कारण कर्जाची परतफेड जास्तीत जास्त तीन महिन्यांच्या आत होत असल्याने रोख पैसा त्यांच्या हातात खेळत राहतो. व्याजाचा दर कमी मिळत असला, तरी तोच पैसा वारंवार गुंतवता येत असल्याने धोका न पतकरता उत्पन्न मिळविता येते.

इंग्‍लंडच्या प्रचंड परदेशी व्यापारामुळे तेथील हुंडीबाजार अतिशय विकास पावला आहे. तेथील बँकांची अत्यल्पमुदती खेळत्या भांडवलाची गुंतवणूक मुख्यत्वेकरून हुंडीबाजारात असते. अमेरिकेमध्ये वायदेबाजारातील लोकांना मोठ्या प्रमाणावर बँका कर्जे देतात. अनेक कारणांमुळे अमेरिका, फ्रांस यांसारख्या देशांत हुंडीबाजाराचा विकास होऊ शकला नाही. परंतु सध्या बहुसंख्य देशांतील बँका सरकारी हुंड्यांमध्ये आपले बरेचसे अत्यल्पमुदतीचे खेळते भांडवल गुंतवितात; कारण अनेक देशांतील सरकारे करउत्पादन व खर्च यांची तोंडमिळवणी करण्याकरिता हुंड्यांच्या रूपाने कर्जे घेत असतात.

मुरंजन, सुमंत

भारतातील नाणेबाजार हा फारसा सुसंघटित नाही. किंबहुना इतर विकसनशील राष्ट्रांतील नाणेबाजारांप्रमाणेच त्याचे दोन विभाग पडतात–संघटित व असंघटित. संघटित विभागात रिझर्व्ह बँक, राष्ट्रीयीकृत भारतीय बँका व इतर भारतीय आणि परदेशी बँका यांच्याबरोबरच मागणीकर्ज दलाल व इतर वित्तीय आणि रोखेदलाल यांचा समावेश होतो. बँकांचे आपसांतील मागणी कर्जव्यवहारही याच विभागात प्रामुख्याने चालतात. मात्र इतर प्रगत राष्ट्रांतील नाणेबाजारांप्रमाणे व्यापारी हुंड्या किंवा राजकोषपत्रे यांच्या व्यवहारांसाठी भारतामध्ये बाजाराची सोय नाही. असंघटित विभागात मुख्यतः देशी पेढ्या असतात व तेथे अल्पमुदती आणि दीर्घमुदत कर्जांमध्ये स्पष्ट सीमांकन आढळत नाही; कारण देशी हुंडीवरून ती व्यापारी हुंडी की निभाव पत्र आहे, हे स्पष्ट होत नाही. बहुधा निभाव पत्रांचाच व्यवहार या विभागात होत असतो; परंतु बँका व विशेषतः परदेशी बँका व्यापारी हुंड्या वटविण्यास तयार असतात. अनेक कारणांमुळे भारतात इतर देशांप्रमाणे हुंडीबाजारांचा विकास झालेला नाही. मात्र रिझर्व्ह बँक असा विकास घडवून आणण्याचे प्रयत्‍न करीत आहे.

भारतीय नाणेबाजाराची संरचना विस्कळित असली, तरीसुद्धा तिच्यामध्ये काही प्रमाणात समन्वय आढळतो. देशी पेढ्यांना व्यापारी बँका पुनःवटवणीची सलवत देतात व व्यापारी बँकांनाही रिझर्व्ह बँक अशी सवलत देते. अलीकडे मात्र व्यापारी बँका लघुउद्योगांना अणि व्यापाऱ्यांना कर्जपुरवठा करू लागल्याने देशी पेढ्यांना पुनःवटवणीची सवलत देण्याचे प्रमाण त्यांनी पुष्कळच कमी केलेले आहे. शिवाय सहकारी पतसंस्थांमार्फत रिझर्व्ह बँक शेतीसाठी कर्जे पुरविते व व्यापारी बँकांनाही अशी कर्जे देण्यास उत्तेजन देते. साहजिकच सहकारी पतसंस्था व नाणेबाजार यांचे संबंध अधिक निकटचे झाले आहेत.

भारतीय नाणेबाजारांच्या संरचनेमुळे रिझर्व्ह बँकेला आपली मौद्रिक नियंत्रणाची साधने वापरताना अडचणी उद्‌भवतात. एक तर, नाणेबाजारातील कर्जाची मागणी हंगामी स्वरूपाची असते. कृषिहंगामानुसार कर्जाच्या मागणीत चढउतार होत जातात व त्यामुळे मौद्रिक स्थैर्य टिकविणे कठीण होते. दुसरे म्हणजे व्यापारी बँकांकडेसुद्धा कर्जाची मागणी हंगामी स्वरूपाचीच असते; कारण शेतमालाच्या व्यापारासाठी व कापड, साखर इ. शेतमालावर आधारलेल्या उद्योगांसाठी लागणाऱ्या कर्जाची गरजही हंगामीच असते. साहजिकच रिझर्व्ह बँकेला ही परिस्थिति लक्षात घेऊनच मौद्रिक नियंत्रणधोरण आखावे लागते. शिवाय राजकोषपत्रे व निमसरकारी रोखे यांच्या व्यवहारांसाठी असलेला बाजार अत्यंत सीमित असल्याने पतनियंत्रणासाठी खुल्या बाजारात रोख्यांचे व्यवहार करताना रिझर्व्ह बँकेला अडचण भासते.