आपल्याकडे येणारा पैसा सत्कारणी लागतोय की नाही, भविष्यात त्याचा आपल्याला उपयोग होणार की नाही, अगदीच अडचणीच्या वेळी हातात खेळणारा हाच पैसा मदतीला येईल की नाही... अशा सामान्यांच्या मनात उमटणा-या प्रश्नांची उत्तरं 'मनी मॅनेजर्स' देऊ शकतात. हा एक उत्तम करिअरचा पर्यायही होऊ शकतो.
पगार झाल्यानंतर महिन्याचा पेट्रोल, हॉटेल याचे खर्च भागवायचे.... मग घरच्यांसाठी काहीतरी... पुढच्या पगारामध्ये एखाद्या खास व्यक्तीसाठी खरेदी... आणि त्यानंतरचे नेहमीचा खर्च वगळता इतर पगार आपल्यासाठीच..., फार फार तर कुठल्यातरी गुंतवणुकीसाठी वापरायचे की झालं...
बातम्यांमधून बजेटचे वेध लागायला सुरुवात झाली, की नुकतीच कमवायला लागलेली किंवा अगदी चिक्कार पैसा कमावणारी प्रत्येक व्यक्ती असाच विचार करते. त्यासाठी सर्व पर्यायी मार्गही ती चोखाळते; पण शेवटी आपल्याकडे येणारा पैसा सत्कारणी लागतोय की नाही, भविष्यात त्याचा आपल्याला उपयोग होणार की नाही, अगदीच अडचणीच्या वेळी हातात खेळणारा हाच पैसा मदतीला येईल की नाही... अशा असंख्य प्रश्नांविषयी मात्र ती साशंकच असते.
आथिर्क बचतीच्या वा गुंतवणुकीच्या पर्यायांविषयी अशा सर्व शंकांना योग्य पर्यायांविषयी मार्गदर्शन करण्यासाठी 'पर्सनल फायनान्शियअल अॅडव्हायजर' काम करत असतात.
पैसा मॅनेज करा... दुस-याचा!
एखाद्या व्यक्तिसाठी कमाईच्या पहिल्या दिवसापासून ते अगदी निवृत्तीपर्यंतच्या कमाईचे नियोजन करून देण्याचं काम 'पर्सनेल इन्व्हेस्टमेंट मॅनेजर'ला करावं लागतं. अल्पमुदतीच्या गुंतवणुकींसोबतच २० वर्षांनंतरच्या कार्यासाठी आवश्यक गुंतवणुकीचं नियोजन करण्याचं वा सुचविण्याचं कामही ते करतात. त्यासाठी ग्राहकाच्या आथिर्क परिस्थितीचा आणि उलाढालींचा अभ्यास करत, योग्य पर्यायांचा सल्ला देणं त्याला क्रमप्राप्त असतं. त्यासाठी त्याला गुंतवणुकीचे सर्व पर्यायी मार्ग, माकेर्टची परिस्थिती आणि अंदाज, छोट्या-मोठ्या आणि नव्याने उदयाला येत असलेल्या कंपन्यांमधील भाग-भांडवल याची परिस्थिती आदी बाबींची माहिती असणं आवश्यक ठरतं.
सीएसपी आणि सीपीएफए
इकडे वळण्यासाठी 'नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ सिक्युरिटी माकेर्ट्स'तफेर् घेतली जाणारी 'सटिर्फाईड पर्सनेल फायनान्शिअल अॅडव्हायजर' (सीपीएफए) परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण असणारे लोक 'पर्सनेल फायनान्शिअल अॅडव्हायजर' म्हणून काम करण्यास पात्र ठरतात. या क्षेत्रामध्ये शिरण्यासाठी कॉमर्सची पार्श्वभूमी असणे कधीही उत्तम; पण तुम्ही निव्वळ बी.कॉम. किंवा एम.कॉम. आहात म्हणून तुम्ही एक यशस्वी फायनान्शिअल अॅडव्हायजर बनू शकता, असेही म्हणता येत नाही. सध्या कॉमर्सच्या शिक्षणाचा कोणताही गंध नसलेले वा अगदी इंजिनीअरिंगची शैक्षणिक पार्श्वभूमी असणारे लोक या क्षेत्रामध्ये काम करताना आपण पाहू शकतो. म्हणूनच कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असणारे या क्षेत्राचा करिअरसाठी नक्कीच विचार करू शकतात. विशेष म्हणजे या परीक्षेची तयारी स्वत: ची स्वत: लाही करता येत असल्याने काम करता-करताही या करिअरचा विचार करता येणे शक्य आहे.
' सटिर्फाईड फायनान्शिअल प्लॅनर' (सीएफपी) परीक्षा जागतिक पातळीवर मान्यताप्राप्त परीक्षा असली, तरी तिला आपल्याकडे 'सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया'ची (सेबी) मान्यता नाही. त्यामुळे आपल्याकडे 'सीपीएफए'चाच विचार केला जातो. उद्योग किंवा बँकिंग क्षेत्रामध्ये प्रॉडक्ट सेलिंगचा कामाचा अनुभव घेतल्यानंतर काही लोक या क्षेत्राकडे वळतात. परंतु त्यापेक्षाही माकेर्टिंगचा अनुभव असलेल्यांसाठी हे क्षेत्र तुलनेने सोपे असते. समाजामध्ये वावरताना आवश्यक असणारी सर्वसाधारण कौशल्ये आणि पैशाच्या नियोजनाशी निगडीत सेवांचे माकेर्टिंग करण्याची कौशल्ये जर तुमच्याकडे असतील, तर अनेक नामवंत कंपन्यांमध्ये तुम्ही काम करण्यास पात्र ठरू शकता.
' बेस्ट पसोर्नेल फायनान्शिअल अॅडव्हायजर' ची वैशिष्ट्ये
उत्तम संवाद कौशल्ये
समोरच्या व्यक्तिच्या अपेक्षा जाणून घेण्याची क्षमता
एखाद्या गुंतवणुकीत तोट्यात गेलात तरी त्रागा न करता चूक मान्य करा. पुढच्या वेळी ती टाळण्याची क्षमता हवी.
एखाद्या प्रकारच्या गुंतवणुकीमध्ये शिरल्यानंतर भविष्यात त्याचे परतावे कसे मिळतील, याची माहिती हवी.
चलनवाढीचा अंदाज आणि आथिर्क तरतूदीचं कौशल्य
फायनान्शिअल मॅनेजमेंट, इन्व्हेस्टमेंट स्ट्रेटेजिस, इन्शुरन्स प्लॅनिंग, रिटायरमेंट प्लॅनिंग, टॅक्स अँड इस्टेट प्लॅनिंग या 'पंचसूत्री'ची परीपूर्ण तयारी सो फ्रेंड्स, आकड्यांशी खेळायचा छंद, माकेर्टमध्ये चालणाऱ्या व्यवहारांचा अभ्यास, आणि शेअर माकेर्टमध्ये आलेल्या उतार-चढावांमुळे अनुभवलेली अस्वस्थता असं काही वाटत असेल आणि समोरच्या व्यक्तिच्या गरजा जाणून घेत त्यांना आथिर्क सल्ला देण्याची साशंकता तुमच्या मनात नसेल, तर 'पर्सनेल फायनान्शिअल अॅडव्हायजर' हा तुमच्यासाठी करिअरचा एक चांगला पर्याय होऊ शकतो. विचार करण्यास नक्कीच हरकत नाही. कारण 'व्हेअर देअर इज ए विल, देअर इज ए पाथ...' अँड सो ऑन!

No comments:
Post a Comment