Sunday, September 1, 2013

कोण जिंकलं??? काय साधलं???

‘जैतापूर अणुउर्जा प्रकल्प होऊ देणार नाही’ अशी हाक देत गेली तीन वर्ष लढा देणार्‍या माडबन संघर्ष सेवा समितीने आपला विरोध मागे घेतलाय. समितीने समझोता करण्याची तयारी दाखवलीय. समितीच्या सदस्यांनी आज उद्योगमंत्री नारायण राणेंची भेट घेतली. या बैठकीनंतर प्रकल्पाचा विरोध मागे घेत असल्याचं समितीनं जाहीर केलं.

समितीने अखेरच्या 25 सुचना केल्या असून लवकरच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत बैठक होणार असून यावर चर्चा केली जाणार आहे अशी माहिती नारायण राणे यांनी दिली. तर जनसमुदाय एकत्र होऊ दिला नाही. तो मीच एकत्र केला त्यामुळे यायचं भाषण करायचं याला आंदोलन म्हणत नाही. जैतापूरसाठी आम्ही लाठ्याकाठ्या खाल्यात. आजार पदरात पाडून घेतला पण आता शक्य नाही असं सांगत माडबन जनहित सेवा समितीचे अध्यक्ष प्रवीण गवाणकर यांनी जनतेची जाहीर माफी मागितली. दरम्यान, समितीच्या या भूमिकेमुळे जैतापूर प्रकल्पावर विरोध करणार्‍या शिवसेनेला चांगलाच धक्का बसल्याचं बोललं जातंय.

विरोध का मावळला?

जैतापूर प्रकल्पातलं मुळं आंदोलन हे माडबन संघर्ष सेवा समितीने उभारलं होतं. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी मवाळ भूमिका घेतली. आता ही समिती माडबन जनहित सेवा समिती झाली आहे. याला कारण असे की, काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदल देण्याचं जाहीर केलं आणि त्यानंतर अनेक प्रकल्पग्रस्तांनी मोबदला घेण्यास सुरूवात केली. 2300 खातेदारांपैकी 27 खातेदारींनी सुरूवातीला मुळं मोबदल उचलला त्यांच्यापाठोपाठ 297 जणांनीही मोबदला घेतला. तसंच या आंदोलनाचे नेतृत्त्व करणार्‍या प्रवीण गवाणकर यांना कर्करोगाने ग्रासलं. त्यामुळे त्यांनी एक पाऊल मागे घेण्याचा निर्णय घेतला. अखेर आज नारायण राणे यांच्याशी चर्चा करून त्यांनी आपला विरोध मागे घेत असल्याचं स्पष्ट केलं.

No comments:

Post a Comment