Wednesday, July 11, 2012

अदिवासी हक्क

अदिवासी हक्क

‘कुणब्याच्या जन्मा जाशी तर पेरू-पेरू मरशी, वाघाच्या जन्मा जाशी तर तोलू-तोलू मरशी पन् काथोड्याच्या जन्मा जाशी तर जंगलचा राजा होशी’ अशी एक म्हण कातकरी जमातीत प्रचलित होती. तसे पाहायला गेल्यास सर्वच आदिवासी जमातींना आपल्या जंगलावरच्या स्वामित्वाबद्दल अभिमान असतो; परंतु इंग्रजांच्या आगमनापासून आदिवासींना जंगलातून हुसकावून लावण्यात आले आणि त्यांच्या जगण्याचा आधारच तुटला. 1861 मध्ये ब्रिटिश लॉ अ‍ॅण्ड रेव्हेन्यू सुपरिटेंडेंड वेडन-पॉवेल याने सर्वप्रथम देशात वन कायदा लागू केला, लेखणीच्या एका फटका-यानिशी त्याने भारतातील सर्व जमीन व जंगले इंग्रजांच्या मालकीची केली. त्याचा सगळ्यात जास्त फटका आदिवासींना बसला. जंगलातील फळे-फुले, कंदमुळे आणि शिकार यावर जगणारा आदिवासी त्याच्याच जंगलात उपरा ठरला. आजही परिस्थिती बदललेली नाही. त्यामुळे परवा केंद्रीय आदिवासी विकासमंत्री व्ही. किशोरचंद्र देव यांनी महाराष्ट्रासह 17 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना ‘वनहक्क कायद्या’ची अमलबजावणी करताना आदिवासी जमातींची पुरेशी काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. आता तरी शासकीय यंत्रणांनी आणि आदिवासींच्या नावावर मोठ्या झालेल्या राजकारण्यांनी आणि तथाकथित समाजसेवकांनी आदिवासी विकासाचे प्रामाणिक प्रयत्न सुरू करावेत. अन्यथा भावी पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत!
आदिवासी या शब्दातच भारतातील आदिवासी जमातींचे आदिम तत्त्व सामावलेले आहेपरंतु रास्वसंघाच्या वर्णवर्चस्ववादी विचारसरणीला हे आदीमपण मान्य नाहीत्यामुळे ते आदिवासींना वनवासी’ म्हणतातभारतीय घटनेत सर्वच आदिवासींना अनुसूचित जमाती’ म्हणून संबोधले जातेदेशाच्या एकूण लोकसंख्येच्या 8.2 टक्के असलेला हा आदिवासी समाज एका संपन्न लोकपरंपरेचा भाग आहेपरंतु इंग्रजांच्या आगमनापासून आदिवासी जमातींच्या स्वायत्तसंपन्न आणि स्वच्छंद जगण्यावर बंधने आलीस्वातंत्र्यानंतर गो-या साहेबांच्या जागी आलेल्या देशी साहेबांनी आदिवासींचे जगणे असह्य केलेपरिणामी आज 10 कोटींहून अधिक लोकसंख्या असलेले आदिवासी आपले स्वत्व हरवून बसले आहेत.
आधुनिकीकरणाच्याप्रगतीच्या आणि जागतिकीकरणाच्या नावाखाली आम्ही आदिवासींचा मूळ धर्मसंस्कृतीकलानृत्यवाद्य,औषधोपचार अशा सर्वच मौलिक गोष्टींचा त्याग करत आहोतमूळ आदिवासींना प्रगतीचा पुढचा टप्पा म्हणजे पांढरपेशा वर्गासारखे जीवन जगणेअसे वाटते तर अन्य समाजाला या हरवत चाललेल्या आदिवासीपणाची पर्वा नाहीअसे विचित्र चित्र आज देशातील सर्वच आदिवासीबहुल भागात दिसतेयदेशभर विखुरलेल्या आदिवासी जमातींमध्ये होत असलेल्या या सामाजिक आणि सांस्कृतिक स्थित्यंतराचे परिणाम भयंकर आहेतनेपाळच्या सीमेपासून बिहारमध्यप्रदेशझारखंडआंध्रमहाराष्ट्रकर्नाटकओरिसा,पश्चिम बंगाल आदी प्रांतात पसरलेला माओवादी दहशतवाद असो वा ईशान्य भारतातील मणिपूरनागालँड आदी सीमावर्ती प्रदेशांमध्ये फोफावलेला फुटिरतावाद असोया सगळ्या दहशतवादी चळवळींमध्ये लढणारे बहुतांश लोक आदिवासी आहेतआज त्यांच्या हिंसक कारवाया दुर्गम वनक्षेत्रात होत असल्यामुळे आपल्याला त्याची चिंता वा काळजी वाटत नाहीपण उद्या त्यांनी शहरातील सिमेंटच्या जंगलात’ प्रवेश केलातर काय होईल याची कल्पनाच करता येत नाहीआदिवासींच्या भल्यासाठीविकासासाठी बनवलेल्या कायद्यांची योग्य अंमलबजावणी झाली पाहिजेत्यांचे न्याय्य हक्क त्यांना मिळालेच पाहिजेत आणि मुख्य म्हणजे आदिवासींचा विकास करताना त्यांचे आदिवासीपण जपण्याचा प्रयत्न झाला पाहिजेअन्यथा न्युझीलंडकॅनडाऑस्ट्रेलिया वा अमेरिकेतील आदिवासी जसेम्युझियममध्येच पाहायला मिळताततशी अवस्था आपल्याकडेही होईल की कायअशी भीती वाटते.
आदिवासी जमातींमधील कुपोषणदारिद्रय आणि एकंदर रोगराई या सगळ्याचे मूळ अज्ञानात आहेत्यामुळे महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने कैठक्कर बाप्पाअनुताई वाघआचार्य भिसे गुरुजीधनाजी नाना चौधरीकॉगोदूताई परुळेकरचित्रे गुरुजीबाळासाहेब देशपांडे आदी ध्येयप्रेरित समाजसेवकांनी आदिवासी भागात ज्ञानगंगा पोहचवण्याचे अथक व अफाट प्रयत्न केलेदुर्गम पाडय़ा-वाडय़ा-वस्त्यांवर विखुरलेल्या आदिवासी समाजाला मूळ प्रवाहात आणणेहे काम 100 वर्षापूर्वी जेवढे आव्हानात्मक होते,तेवढेच आजही आहेतरीही हजारो ध्येयवेड्या समाजसेवकांनी आपला धर्म वा तत्त्वज्ञान आदिवासींनी स्वीकारावेया हेतूने का असेना,आदिवासींच्या उन्नत्तीसाठी प्रयत्न केलेपरंतु ते पुरेसे नसल्यामुळे दिवसेंदिवस आदिवासींचे जगणे मुश्किल होत चाललेले दिसते.
केंद्रीय आदिवासी विकास मंत्र्यांनी 17 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात वन हक्क कायदा’ कसा राबवावायाचे निर्देश दिले आहेततेच निर्देश आदिवासींशी संबंधित सगळ्याच योजना वा कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी योग्य वाटतातआदिवासींचा वनांवरील वंशपरंपरागत हक्क मान्य करून सरकारने त्यांना उपजीविकेसाठी एक साली प्लॉट’ देण्याची तरतूद या वनहक्क कायद्यात आहेज्या आदिवासी कुटुंबाकडे त्या जमिनीचा ताबा’ असेलत्या वनखात्याच्या मालकीच्या जमिनीचे एक वर्षासाठी आदिवासी व्यक्तीकडे हस्तांतरण होतेत्या जागेला एक साली प्लॉट’ म्हणतातपरंतु या कायद्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होत नसल्यामुळे आदिवासींचा वनांवरचा हक्क नाकारला जात आहेयाबद्दल आदिवासी विकास मंत्रालयाने चिंता व्यक्त केली आहेमुख्य म्हणजेज्या आदिवासी कुटुंबाचा वनावरील हक्क नाकारला जातोत्यांना त्याची साधी कल्पनाही दिली जात नाहीमग सरकारच्या निर्णयाविरोधात अपील करण्याचा प्रश्नच उद्भवत नाहीअंतिमतत्या आदिवासी लोकांना सरकारी निर्णयाचा आधार घेऊन जंगलातून हाकलण्यात येतेहे थांबवले पाहिजेअसे सांगून आदिवासी विकास मंत्रालयाने आदिवासींचा जंगलावरील हक्क शाबूत रहावा यासाठी अत्यंत क्रांतिकारी निर्देश दिले आहेतआपल्या पत्रात व्हीकिशोरचंद्र देव म्हणतात, ‘जंगलातील फळेकंदमुळेबी-बियाणे आदींवर उपजीविका चालवण्याचा आदिवासींना हक्क मिळेलअसे पाहावेतसेच जंगलामध्ये त्यांना कोणत्याही प्रतिबंधाशिवाय प्रवेश मिळावा.’
17 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी वनहक्क कायद्याची योग्य पद्धतीने अमलबजावणी करण्यासाठी ग्रामसभांच्या अधिकारात लवचिकता आणावीजनजागृतीची माध्यमे अधिक प्रभावी करावीयासोबत वनविभाग आणि अन्य संबंधित सरकारी खात्यांकडून केली जाणारी फरफट थांबवली पाहिजेअसे स्पष्ट निर्देश या पत्रात दिलेले आहेतहे सगळे होत नसल्यामुळे खूप मोठय़ा प्रमाणात जंगलात राहणाऱ्या आदिवासींचा वनाधिका-यांकडून छळ होत आहेत्यांना त्यांच्या जागेतून हुसकावून लावण्यात येत आहेकित्येक आदिवासींची तर त्यांच्याच जागेतून बेकायदेशीरपणे हकालपट्टी झालेली दिसतेनिव्वळ कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आदिवासींच्या हक्काचा सन्मानही राखला जात नाहीयाबद्दल आदिवासी विकास मंत्री देव यांनी खंत व्यक्त केली आहेत्याची दखल फक्त 17 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी नव्हे तर या देशातील दलित-पिडीत आणि शोषितांच्या विकासाचा विचार करणा-या प्रत्येक व्यक्तीने घेतली पाहिजे.
1861 मध्ये जेव्हा बेडन-पॉवेलने सगळ्या वनजमिनीवर इंग्रजांची मालकी घोषित केलीत्यावेळी अज्ञानामुळे आदिवासी त्या निर्णयाला आव्हान देऊ शकले नाहीतवास्तविक पाहता त्यावेळी राजपूताना ते डांगपर्यंत भिल्लांचा अमल चालत असेगोंडवन या शब्दातच गोंडांचे जंगल हा अर्थ समाविष्ट होताठाणे जिल्ह्यातील जव्हारचे आदिवासी राजे महादेव कोळी होते म्हणून त्यांच्या प्रभावक्षेत्राला कोळवण म्हणत असतत्याचप्रमाणे कोरकूमाडियामुंडा आदी आदिम जमातींचे आपापले वनक्षेत्र होतेपण त्यांना हा इंग्रजांचा निर्णय कळेपर्यंत उशीर झाला होतात्यातही राजसत्तेच्या जवळ असणा-या काही प्रभावशाली कुटुंबांनी आपापल्या जमिनी राखल्या;पण सारे जंगल इंग्रजांच्या प्रभावाखाली गेलेहा इंग्रजी अमल साधा-सुधा नव्हताजंगलात राहणा-या आदिवासीला विडी वा चिलीम पेटवण्यासाठी गारगोटीची चकमक’ लागायचीती जवळ बाळगण्यासाठीसुद्धा ब्रिटिश सरकारची परवानगी घ्यावी लागेकारण काय तर त्या चकमकीमुळे वणवा पेटू शकतोअशी भीती’ गो-या साहेबांना वाटत होतीतर या अशा जुलमी पद्धतीने जंगलज्यावर आदिवासी जगत होतेते इंग्रजांनी हिरावून घेतले होतेभारतीय वनखात्यानेही ब्रिटिशांचा कित्ता गिरवण्याचे पापकृत्य केल्याने आदिवासींची ससेहोलपट आजही सुरूच आहेइंग्रजांच्या या फॉरेस्ट कायद्याला सर्वप्रथम आव्हान दिले होतेमहात्मा जोतीबा फुले यांनी. ‘शेतक-यांचा असूड’ या पुस्तकात जोतीबांनी इंग्रजांच्या या जुलूम-जबरदस्तीवर जोरदार कोरडे ओढले होतेजंगलकायदा अमलात येण्याच्या काही काळ आधी 1853 मध्ये भारतात रेल्वे सुरू झालीदेशांतर्गत बंडाळी वाढत असताना सैन्याच्या जलद हालचालींसाठी रेल्वेमार्गाचे जाळे वाढवणेहे ब्रिटिश राजवटीचे मुख्य उद्दिष्ट होते1880 च्या आत ब्रिटिशांच्या खाजगी रेल्वे कंपन्यांनी देशांतर्गत 11 हजार 700 कि.मीलांब लोहमार्ग टाकलारेल्वेमार्गाच्या स्लीपर्ससाठी डांग आणि ठाणे जिल्ह्यातील साग आणि ब्रह्मदेशआसाम परिसरातील मोठीच्या मोठी जंगले तोडण्यात आलीया सर्वच रेल्वेगाड्या कोळशाच्या इंजिनावर चालायच्यादगडी कोळशासोबत लाकडाची मोठ्या प्रमाणावर गरज पडायचीत्यामुळे प्रगतीच्या पहिल्या पावलानेच देशातील हजारो एकर जंगल अगदी कायदेशीररीत्या नष्ट केले होतेआदिवासींच्या विस्थापनाची ती सुरुवात होती.. आजही देश स्वतंत्र होऊन सहा दशके उलटली तरी ही विस्थापनाची प्रक्रिया थांबलेली नाहीआदिवासी लोकांचे हे असे मुळापासून उच्चाटन होणे थांबवण्यासाठी केंद्रीय आदिवासी विकास मंत्री देव यांनी घेतलेला पुढाकार फार महत्त्वाचा आहे.
स्वातंत्र्याच्या चळवळीला वेग येण्याआधीपासून आदिवासी राजेसरदार आणि धर्मगुरू यांनी वारंवार ब्रिटिश सत्तेला आव्हान दिले होते.जंगलाची खडान्खडा माहिती असलेल्या आदिवासींकडे भलेही आधुनिक शस्त्रे नव्हतीतरीही त्यांचा जंगलात पराभव करणे इंग्रजांना कठीण होते1831 मध्ये कोल जमातीच्या लोकांचे बंड असो वा 1855 चा संथाळांचा जबरदस्त उठावइंग्रजांनी आदिवासींच्या प्रश्नांकडे सहानुभूतीने पाहिलेच पाहिजेअसे ते सुचवत होतेओरिसामध्ये 1789 ते 1832 या दरम्यान सात वेळा उठाव केल्याची नोंद स्टीफन फूक यांनी केली आहेयाच उठावांमुळे जी पार्श्वभूमी तयार झाली होतीत्यामधून क्रांतदर्शी बिरसा मुंडा या नेत्याचा उदय झाला1895 च्या सुमारास मिशनरी शाळेत शिकलेल्या बिरसाने इंग्रजी सत्तेला आव्हान देण्याची तयारी सुरू केली होतीआपण परमेश्वराचे प्रेषित आहोतअसे सांगून बिरसा मुंडाने लोकांची जमवाजमव सुरू केली होतीपरंतु इंग्रजी सत्तेला पराभूत करण्याएवढे सामर्थ्य त्याच्याजवळ नव्हतेत्यामुळे आधीच्या उठावांप्रमाणे बिरसा मुंडाचा उठावही असफल ठरला1897 मध्ये अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत तुरुंगामध्ये हा आदिवासी नेता मरण पावला होताबिरसा मुंडांप्रमाणे अनेक बंडखोर नेत्यांनी आदिवासी तरुणांना स्वातंत्र्य आणि स्वराज्याची स्वप्ने दाखवून बंडाला प्रवृत्त केले होतेपरंतु ही बंडाळी कधीच यशस्वी झाली नाहीतस्टीफन फूक या संशोधक-लेखकाने रिबेलियस् प्रॉफेटस्’ या ग्रंथामध्ये या सर्व उठावांची चांगली कारणमीमांसा केली आहेतो म्हणतो, ‘आदिवासी समाजातील अज्ञान आणि अंधश्रद्धेचा कुणीही फायदा घेतो.’ एखाद्या साधू वा बैराग्याने यावे आणि सांगावे कीमी देवाचा अवतार आहे. ‘‘कोणे एके काळी सर्वत्र आदिवासींचे राज्य होतेतो सुवर्णकाळ गेला आणि आदिवासींचे हाल सुरू झालेचला आपण आपल्या हिंमतीच्या बळावर तो सुवर्णकाळ पुन्हा आणू या.’’ असे गुलाबी चित्र दाखवूनफसव्या गोष्टी सांगून आजही आदिवासींची दिशाभूल केली जातेमाओवादी दहशतवादी सध्या आदिवासींची दिशाभूल करण्यात आघाडीवर आहेतआदिवासींची भूक आणि भूमी हे दोन प्रश्न घेऊन नक्षलवादी चळवळ उभी राहिली आणि फोफावलीपण त्यामुळे आदिवासींचा सर्वागीण विकास झाला काअसा प्रश्न कुणी विचारला तर उत्तर नकारार्थीच येतेउलट नक्षलवाद्यांच्या जंगलप्रवेशामुळे आदिवासी मुख्य प्रवाहापासून जास्तीत जास्त दूर गेला आणि यापुढेही जात राहीलनक्षली तत्त्वज्ञान हिंसेच्या पायावर उभे आहेनक्षलवादाचे जनक चारू मुझुमदार आणि कनू संन्याल यांनी माओ त्से तुंग यांचे, ‘क्रांती ही बंदुकीच्या नळीतून जन्माला येते’ हे वाक्य प्रमाण मानून चळवळ बांधलीत्यामुळे आदिवासी भागात हिंसेचा लालभडक वणवा पेटलाअर्थात या वणव्याची सर्वात जास्त धग आदिवासींनाच बसतेहे कटुसत्य आहेनक्षलवाद्यांच्यादलममध्ये नवीन नक्षलवाद्यांची भरती करताना बेकार आदिवासी तरुणांना प्राधान्य दिले जातेहल्ली केंद्र आणि राज्य सरकारही नक्षलवादी चळवळींशी टक्कर देण्यासाठी पोलीस वा अन्य सुरक्षा दलात आदिवासी तरुणांना भरती करताना दिसतात.
थोडक्यात काय तर जंगलात होणा-या चकमकींत दोन्ही बाजूकडून मरणारा आदिवासीच असतो.. गेल्या आठवड्यात छत्तिसगढमध्ये जे नक्षलवादविरोधी ऑपरेशन’ झालेत्यात 19 आदिवासी तरुण मुले-मुली मारल्या गेल्याया निरपराधांचा अपराध एकच होता की ते जंगलात राहत होतेनक्षली आणि माओवाद्यांची दहशत मोडण्यासाठी सज्ज झालेले सुरक्षा दल या दोघांच्या साठमारीत निरपराध आदिवासी मरत आहेत.. गृहमंत्री पीसीचिदंबरम् यांनी, ‘जर त्या नक्षलविरोधी कारवाईत कुणी निरपराध मारला गेला असेल तर मला त्याबद्दल खेद वाटतो.’ असे बोलून काही फायदा नाही..त्यांच्या माफी मागण्याने मरण पावलेले कोवळे जीव परत येणार नाहीत.
नक्षलवाद्यांप्रमाणेच कम्युनिस्टसंघप्रणीत हिंदुत्ववादी संस्था आणि ख्रिश्चन मिशनरीज जमेल त्याप्रमाणे आदिवासींना आपल्या फायद्यासाठी वापरताना दिसतातअर्थात याला अनेक सन्माननीय अपवाद आहेतराजकीय पक्षही त्यात मागे नाहीतया सगळ्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर समस्त आदिवासींना दिशा दाखवेलअसा डॉबाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा महान नेता मिळायला हवा.बाबासाहेबांनी दिलेली शिकासंघटीत व्हा आणि संघर्ष करा’ ही त्रिसूत्री देशातील अवघ्या अनुसुचित जातींच्या विकासासाठी उपयुक्त ठरलीत्याच त्रिसूत्रीचा आधार घेऊन सगळ्या आदिवासी जमातींचा विकास होऊ शकतोफक्त त्या विचारांना लोकांपर्यंत नेणे गरजेचे आहेपण स्वार्थात बरबटलेल्या आदिवासी नेत्यांना आमदारकी वा मंत्रिपद आणि तथाकथित समाजसेवकांना देशी-विदेशी निधी याशिवाय काही दिसत नाही.
आदिवासींच्या भोळेपणाचा फायदा उठवून बहुतांश नेते त्यांना चुकीच्या मार्गावर नेतातअशाच एका आदिवासी संघटनेने सध्या खानदेशात खळबळ उडवली आहेचार दिवसांपूर्वी सीसरकार’ म्हणून ओळखल्या जाणा-या संघटनेने अंमळनेर तालुक्यातील झाडी या गावावर गायरानाच्या हक्कासाठी 400-500 लोकांचा शस्त्रसज्ज जमाव घेऊन हल्ला केलाही संघटना एका विचित्र तत्त्वज्ञानावर आधारलेली आहेसुमारे 14 वर्षापूर्वी या सीसरकार’ संघटनेचे राष्ट्रपती’ कुंवर केशरी सिंह यांची भेट झाली होती.भारतीय कायदेभारतीय चलन न मानणा-या या पंथाचे महाराष्ट्रगुजराथ आणि मध्यप्रदेशात हजारो अनुयायी आहेतआपल्या पंथाच्या स्थापनेमागील कारण सांगताना कुंवर केशरी सिंह यांनी सांगितले होते की, ‘मी दिल्लीत असताना पंडित नेहरू आणि लॉर्ड माऊंटबॅटन यांच्यात सत्ता हस्तांतरणासंदर्भात जो करार झाला होतात्याच्या सर्व फाईल्स पाहिल्यात्या कागदपत्रांमध्ये भारत हा आदिवासींचा देश होतापण तो त्यांच्याकडे न देता नेहरूजींकडे सुपुर्द केलाअसे मला वाचायला मिळालेम्हणून मी आमचे स्वत:चे सरकार स्थापन करण्यासाठी मी सीसरकार’ स्थापले आहेअसे कुंवर केशरी सिंह यांनी सांगितले होतेआपण भारतीय चलन,नोटानाणी काहीच वापरू नयेअसे अनुयायांना का सांगतो याचे अजब तर्कट त्यांनी सांगितले होतेएक आणा म्हणजे सहा पैसे16 आणे म्हणजे एक रुपयापण 16 आण्यांचे 96 पैसे होतातमग 4 पैसे कुठे जातातसीसरकारच्या राष्ट्रपतींच्या या प्रश्नावर माझ्याकडे उत्तर नव्हते.. तर अशी ही संघटना आता पुन्हा सक्रीय झाली आहेकेशरी सिंह यांचे चार वर्षापूर्वीच निधन झालेत्यांचा मुलगा कुंवर रविंद्र सिंह आता राष्ट्रपती’ बनला आहेआदिवासींची जमेल तशी दिशाभूल करत आहे.. कारण शिकलेसवरलेले,आर्थिकदृष्टय़ाराजकीयदृष्टय़ा सक्षम बनलेले लोक पुन्हा आपल्या पाडय़ावर परत जात नाहीत.. आपल्या बांधवांना आपल्यासारखे शिकवत नाहीत.. काही वर्षापूर्वी आमदार केसीपाडवी यांच्या सातपुडा पर्वत रांगेतील एका टेकाडावर वसलेल्या घरी बसलो होतो.संध्याकाळची वेळ होतीके.सी.चे वयोवृद्ध वडील जुना काळ आणि नवीन बदल याबद्दल बोलताना फार चांगले वाक्य बोलून गेले, ‘पूर्वी आदिवासी जंगलावर अवलंबून होताआता तो सरकारी सबसिडींवर अवलंबून आहे.. तो जेव्हा स्वावलंबी होईल त्यावेळीच त्याची प्रगती होईल.’ मी जेव्हा आदिवासींच्या प्रश्नांच्या बाबतीत विचार करतोतेव्हा प्रत्येक वेळी केसीपाडवींच्या बाबांचे शब्द कानात घुमत राहतात!

No comments:

Post a Comment